TRENDING:

'आता आम्ही डायरेक्ट अंडरग्राउंड होऊन...' शाही लग्नसोहळा अन् ग्रँड रिसेप्शननंतर प्लॅन काय? Vijay Deverakonda ने सगळंच सांगितलं

Last Updated:
Rashmika-Vijay Grand Reception: लग्नाच्या सर्व विधींनंतर आता हे जोडपं नक्की काय करणार? या प्रश्नाचं उत्तर विजयने आपल्या खास राऊडी स्टाईलमध्ये दिलं आहे.
advertisement
1/7
शाही लग्नसोहळा अन् ग्रँड रिसेप्शननंतर प्लॅन काय? विजयने सगळंच सांगितलं
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेलं जोडपं विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता अधिकृतपणे 'मिस्टर अँड मिसेस' झाले आहेत. उदयपूरच्या राजेशाही थाटात पार पडलेल्या लग्नानंतर, काल ४ मार्च रोजी हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये या जोडीने एक ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली.
advertisement
2/7
पण या पार्टीत जेवढी चर्चा त्यांच्या लूकची झाली, त्याहून जास्त चर्चा झाली ती विजयने मीडियाला दिलेल्या एका उत्तराची. लग्नाच्या सर्व विधींनंतर आता हे जोडपं नक्की काय करणार? या प्रश्नाचं उत्तर विजयने आपल्या खास राऊडी स्टाईलमध्ये दिलं आहे.
advertisement
3/7
या शाही सोहळ्यात रश्मिका आणि विजयचा लूक एखाद्या राजघराण्यातील जोडीसारखा दिसत होता. रश्मिकाने काळी किनार असलेली गडद लाल रंगाची सिल्क साडी परिधान केली होती.
advertisement
4/7
गळ्यात जड सुवर्णालंकार, कमरेला कमरपट्टा, लांब सडक वेणी आणि भांगात भरलेला शेंदूर... रश्मिका खऱ्या अर्थाने तेलगू राज्यांची नवी सून भासत होती. विजयने पारंपारिक दाक्षिणात्य पांढऱ्या रंगाची धोती आणि शॉर्ट कुर्ता परिधान केला होता. त्याचा हा साधेपणाच चाहत्यांच्या मनाला भावला.
advertisement
5/7
रिसेप्शनच्या धावपळीत जेव्हा पापाराझींनी या जोडीला गराडा घातला, तेव्हा विजयने हसत हसत आपल्या आफ्टर वेडिंग प्लॅनचा खुलासा केला. तो म्हणाला, "आम्ही आता ही सर्व सेलिब्रेशन्स संपण्याची वाट पाहत आहोत. एकदा का हे सगळं आटोपलं की, आम्ही दोघंही थेट अंडरग्राउंड होणार आहोत आणि एकदम शांत राहणार आहोत. तुम्हा सर्वांचे आभार!"
advertisement
6/7
विजयच्या या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे की, गेल्या काही दिवसांपासून कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटमध्ये वावरणारे हे दोघंही आता काही काळ जगापासून दूर जाऊन आपल्या खाजगी आयुष्याचा आणि नवीन प्रवासाचा आनंद घेणार आहेत. रिसेप्शननंतर हे जोडपं आता आपल्या करिअरवर आणि संसारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी छोटा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
7/7
२६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न झाल्यानंतर हे जोडपं प्रथम आपल्या गावी गेलं, तिथे त्यांनी चाहत्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर हैदराबादमध्ये हे भव्य रिसेप्शन ठेवलं. या सोहळ्याला राम चरण, अल्लू अर्जुन यांच्यासह दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आता आम्ही डायरेक्ट अंडरग्राउंड होऊन...' शाही लग्नसोहळा अन् ग्रँड रिसेप्शननंतर प्लॅन काय? Vijay Deverakonda ने सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल