TRENDING:

इशारा खरा ठरला, मराठवाड्यापेक्षा कल्याण डोंबिवली तापलं, सर्वाधिक तापमानाची नोंद

Last Updated:
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीकरांना मराठवाड्यापेक्षा भयंकर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. आज पारा चाळीशीपार गेला आहे.
advertisement
1/5
इशारा खरा ठरला, मराठवाड्यापेक्षा कल्याण डोंबिवली तापलं, सर्वाधिक तापमानाची नोंद
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र तापला आहे. काही भगात मे महिन्यासारखा पारा चढल्याचे चित्र असून कोकणात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. गेल्या 2 दिवसांपासून उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर भागात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली आज मराठवाड्यापेक्षा जास्त तापलं आहे.
advertisement
2/5
कल्याण-डोंबिवली परिसरात आज तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून 41-42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. तुलनेनं मराठवाड्यात आज सरासरी 35-38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना मराठवाड्यापेक्षा भयंकर उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
3/5
कल्याण डोंबिवली परिसर हा मुंबईच्या जवळ असला तरी अंतर्गत भाग आहे. समुद्रकिनाऱ्यापासून हा परिसर दूर असल्याने समुद्राचा थंडावा कमी होतो. त्यामुळे दुपारी पारा चांगलाच चढतो. यंदा 5 मार्चला तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारा 41-42 अंशांपर्यंत चढला असून या वर्षातील उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय.
advertisement
4/5
मरावाड्यात कल्याण-डोंबिवलीसारखा सर्वसाधारणपणे उन्हाळा कडक असतो. सध्या या भागात 35 ते 38 अंशांपर्यंत तापमान गेलंय. मात्र कल्याणसारखी स्थिती नाही. कल्याण डोंबिवलीत काँक्रिटचं जंगल, कमी झाडे, इंडस्ट्रियल झोन आणि कमी हिरवळ यामुळे सध्या तापमान 43 अंशांपर्यंत गेल्यासारखे चटके जाणवतात.
advertisement
5/5
कल्याण-डोंबिवलीत ‘हीट वेव्ह’ सारखी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 2-3 दिवस तापमानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना डिहायड्रेशन, हीट स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागेल. सकाळी 11 ते 4 या वेळेत घरी किंवा सावलीच्या ठिकाणी थांबावे. पाणी भरपूर प्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
इशारा खरा ठरला, मराठवाड्यापेक्षा कल्याण डोंबिवली तापलं, सर्वाधिक तापमानाची नोंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल