बायकोला मारहाण, आईवडिलांवर खोटी केस; 'UK07 रायडर'च्या आरोपांवर भावाचा पलटवार, केली युट्यूबरची पोलखोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Anurag Dobhal Controversy: अनुरागचा भाऊ कलम डोभाल याने समोर येत अनुरागचे सर्व दावे खोडून काढले आहेत. इतकंच नाही, तर कलमने अनुरागच्या काळ्या कृत्यांचे पुरावेच जाहीर केले आहेत.
advertisement
1/9

काल रात्रीपासून सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे अनुराग डोभाल उर्फ 'UK07 रायडर'. आपल्याच कुटुंबाला मृत्यूस जबाबदार धरत त्याने जो रडका व्हिडिओ पोस्ट केला, त्याने इंटरनेट हादरलं होतं.
advertisement
2/9
पण आता या नाट्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. अनुरागचा भाऊ कलम डोभाल याने समोर येत अनुरागचे सर्व दावे खोडून काढले आहेत. "हा सगळा प्रकार केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी रचलेला बनाव आहे," असं म्हणत कलमने अनुरागच्या काळ्या कृत्यांचे पुरावेच जाहीर केले आहेत.
advertisement
3/9
अनुरागने आपल्या व्हिडिओमध्ये पत्नी रितिका सोडून गेल्याचं दुःख मांडलं होतं. मात्र, कलमने इन्स्टाग्रामवर काही चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. कलमच्या दाव्यानुसार, अनुरागने रितिकाला शारीरिक मारहाण केली होती आणि त्याने स्वतः ही गोष्ट आपल्या एका जवळच्या मित्राकडे कबूल केली होती.
advertisement
4/9
पुरावे शेअर करताना कलमने लिहिलंय, "मी व्लॉगर नाहीये, म्हणून इथे पुरावे देतोय. हे सगळं ऐकूनही जर तुम्ही त्याला पाठिंबा देत असाल, तर तुम्हाला मॅच्युरिटीची गरज आहे. रितिकाने त्याला सोडलं कारण त्याने तिच्यावर हात उचलला होता."
advertisement
5/9
कलमने आपल्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर अनुरागचा बुरखा फाडताना सांगितलं की, अनुरागने स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांवर आणि भावावर खोटा कायदेशीर खटला दाखल केला होता.
advertisement
6/9
जेव्हा तो हा खटला कायदेशीररित्या हरला आणि रितिकानेही त्याच्या वागणुकीला कंटाळून घर सोडलं, तेव्हा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने हा 'शेवटचा व्हिडिओ' नावाचा ड्रामा रचला.
advertisement
7/9
कलम म्हणतो, "हा त्याचा रोजचा धंदा आहे. इन्स्टाग्रामवर ट्रॅक्शन मिळवण्यासाठी तो अशा गोष्टी करतो. त्याने स्क्रिप्ट पूर्णपणे फिरवली आहे."
advertisement
8/9
अनुरागने रडत रडत सांगितलं होतं की त्याच्या लग्नात घरचे कुणीच आले नव्हते. पण कलमने एक जुना व्हिडिओ रि-शेअर केला आहे, ज्यात अनुराग आणि रितिका स्वतः कलमचे आभार मानताना दिसत आहेत.
advertisement
9/9
या व्हिडिओमध्ये त्याचे आई-वडीलही लग्नाच्या विधींमध्ये सहभागी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. "व्ह्यूजसाठी स्वतःच्याच आयुष्याची स्क्रिप्ट बदलणारा हा भाऊ," असं म्हणत कलमने अनुरागला उघडं पाडलं आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बायकोला मारहाण, आईवडिलांवर खोटी केस; 'UK07 रायडर'च्या आरोपांवर भावाचा पलटवार, केली युट्यूबरची पोलखोल