Dubai Currency : दुबईत भारतीय रुपयाची किंमत किती? 10,000 रुपये नेले तर तिथे काय काय विकत घेऊ शकता?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एकीकडे युद्धाचे ढग दाटले असताना दुसरीकडे आपल्या खिशातील 'रुपया' दुबईत किती ताकदवान आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील चलनाचे दर आणि तिथली सध्याची स्थिती काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/8

परदेशात फिरायला जाणं म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'दुबई'. उंचच उंच इमारती, अथांग वाळवंट आणि सोन्याची बाजारपेठ यामुळे दुबईने नेहमीच पर्यटकांना भुरळ घातली आहे. अनेकांचे नातेवाईक तिथे कामाला आहेत, तर अनेकजण सुट्ट्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. पण सध्या जगाच्या राजकारणात जे सुरू आहे, त्याने पर्यटकांच्या चिंतेत भर घातली आहे.
advertisement
2/8
एकीकडे युद्धाचे ढग दाटले असताना दुसरीकडे आपल्या खिशातील 'रुपया' दुबईत किती ताकदवान आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील चलनाचे दर आणि तिथली सध्याची स्थिती काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/8
1. मध्य पूर्व आशियात तणाव: काय आहे नेमकं प्रकरण?गेल्या सहा दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणवर हल्ले चढवले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला, अमेरिकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) निशाणा साधला आहे. दुबई हे युएईमधील महत्त्वाचे शहर असल्याने तिथे जाणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
4/8
2. दुबईत 100 भारतीय रुपयांची किंमत किती?दुबई आणि संपूर्ण युएईचे अधिकृत चलन 'दिरहम' (AED) हे आहे. 5 मार्च 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय रुपया आणि दिरहमचे समीकरण खालीलप्रमाणे आहे:1 भारतीय रुपया = साधारण 0.040 युएई दिरहम.100 भारतीय रुपये = साधारण 3.99 युएई दिरहम.
advertisement
5/8
याउलट, जर तुमच्याकडे 100 युएई दिरहम असतील, तर त्याची भारतीय चलनात किंमत सुमारे 2,508 रुपये इतकी होते.(टीप: परकीय चलनाचा दर रोज बदलत असतो, त्यामुळे व्यवहारापूर्वी खात्री करणे आवश्यक आहे.)
advertisement
6/8
3. दुबईवारीचा खर्च: बजेट किती असावे?जर तुम्ही या काळात दुबईला जाण्याचा विचार करत असाल, तर खर्चाचा अंदाज येणे गरजेचे आहेराहण्याचा खर्च: सामान्य हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा खर्च सुमारे 200 दिरहम (AED) येतो. मात्र, जर तुम्हाला लक्झरी अनुभवा हवा असेल, तर हा खर्च दररोज 2,500 दिरहमपर्यंत जाऊ शकतो.स्थानिक बसने प्रवास केल्यास खर्च कमी येतो, पण टॅक्सी वापरल्यास दिवसाला 30 ते 150 दिरहमपर्यंत खर्च होऊ शकतो.
advertisement
7/8
म्हणजेच साधारण दुबईत एक दिवस रहाण्याचा हॉटेलचा खर्च 5,000 रुपये, एक दिवस फिरण्याचा खर्च 2 ते 3 हजार रुपये आणि एक दिवसाच्या खाण्याचा खर्च 2 ते 3 हजार रुपये असेल, म्हणजेच भारतीय 10,000 रुपयात तु्म्ही दुबईमध्ये 1 दिवस आरामात काढू शकता
advertisement
8/8
4. पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?दुबई हे शहर कितीही आधुनिक आणि शिस्तबद्ध असले, तरी तिथले कायदे अत्यंत कडक आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे काही निर्बंध किंवा सुरक्षिततेचे नियम कडक केले जाऊ शकतात. इराण आणि युएईमधील तणावामुळे परिस्थिती थोडी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Dubai Currency : दुबईत भारतीय रुपयाची किंमत किती? 10,000 रुपये नेले तर तिथे काय काय विकत घेऊ शकता?