विदेशी फिरण्यासाठी भारतीयांची पहिली पसंती दुबईच का? एक दोन नाही यामागे आहेत 8 मोठी कारणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, लंडन, पॅरिस किंवा न्यूयॉर्क सोडून भारतीय लोक दुबईलाच इतकी पसंती का देतात? यामागे केवळ चकाचक इमारती हे एकच कारण नाही, तर इतरही अनेक 'देसी' कनेक्शन आहेत. चला तर मग, दुबईच्या या अफाट लोकप्रियतेमागची खरी कारणे जाणून घेऊया.
advertisement
1/9

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत किंवा दिवाळीचं व्हॅकेशन, भारतीय पर्यटकांच्या 'बकेट लिस्ट'मध्ये एका शहराचं नाव नेहमीच टॉपवर असतं, ते म्हणजे दुबई (Dubai). एकेकाळी केवळ वाळवंट असलेल्या या शहराने आज जगातील सर्वात प्रगत आणि विलासी पर्यटन स्थळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखो भारतीय नागरिक दुबईला भेट देतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, लंडन, पॅरिस किंवा न्यूयॉर्क सोडून भारतीय लोक दुबईलाच इतकी पसंती का देतात? यामागे केवळ चकाचक इमारती हे एकच कारण नाही, तर इतरही अनेक 'देसी' कनेक्शन आहेत. चला तर मग, दुबईच्या या अफाट लोकप्रियतेमागची खरी कारणे जाणून घेऊया.
advertisement
2/9
1. 'घरच्या घरी' गेल्याचा भास (Short & Easy Travel)भारतातील मुंबई, दिल्ली किंवा पुणे यांसारख्या शहरांतून दुबईला जाण्यासाठी केवळ 3 ते 4 तास लागतात. म्हणजे कोल्हापूरहून मुंबईला येण्यापेक्षाही कमी वेळात तुम्ही दुसऱ्या देशात पोहोचता. यामुळेच अनेकजण 'लॉन्ग विकेंड'साठीही दुबईचा प्लॅन करतात. विशेष म्हणजे, दुबईचा व्हिसा मिळवणे अत्यंत सोपे आहे. भारतीयांसाठी 'ई-व्हिसा'ची सोय असल्याने शेवटच्या क्षणीही ट्रिप प्लॅन करता येते.
advertisement
3/9
2. बजेटमध्ये लक्झरीचा अनुभव (Luxury for Every Budget)दुबईबद्दल एक गैरसमज आहे की तिथे फिरण्यासाठी खूप पैसे लागतात. पण वास्तव असं आहे की, तिथे ७-स्टार बुर्ज अल अरब पासून ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या बजेट हॉटेल्सपर्यंत सर्व पर्याय उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते हनिमून कपल्सपर्यंत सर्वजण आपल्या बजेटनुसार दुबईची मजा घेऊ शकतात.
advertisement
4/9
3. शॉपिंगभारतीय आणि शॉपिंग हे एक अतूट नातं आहे. दुबई मॉल किंवा एमिरेट्स मॉलमध्ये जगातील सर्व मोठे ब्रँड्स एकाच छताखाली मिळतात. विशेषतः 'दुबई शॉपिंग फेस्टिव्हल' (DSF) दरम्यान मिळणारी मोठी सूट पर्यटकांना खेचून आणते. तसेच, दुबईतील 'गोल्ड सूक' (सोन्याचा बाजार) मधून शुद्ध सोने खरेदी करण्याची ओढ प्रत्येक भारतीय पर्यटकाला असते.
advertisement
5/9
4. आधुनिक जगाची 7 आश्चर्ये (World-Class Attractions)बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारतीवरून दिसणारा नजारा पाहण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे राहतात.तंत्रज्ञानाची कमाल अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.समुद्रात मानवनिर्मित बेट तयार करण्याचे धाडस फक्त दुबईच करू शकते, जे पाहणे हा एक अद्भूत अनुभव असतो.
advertisement
6/9
5. जिभेला चव आणि भाषेची साथपरदेशात गेल्यावर जेवणाचे हात होतील, अशी भीती भारतीयांना दुबईत कधीच वाटत नाही. तिथे पावभाजीपासून ते हैदराबादी बिर्याणीपर्यंत सर्व काही मिळते. दुबईत भारतीय लोकांची संख्या मोठी असल्याने तिथे हिंदी आणि इंग्रजी सर्रास बोलली जाते, त्यामुळे भाषेची कोणतीही अडचण येत नाही.
advertisement
7/9
6. सुरक्षिततेची 100% हमी (Global Safety Standard)दुबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. कडक कायदे आणि शिस्तीमुळे तिथे गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे एकट्या प्रवास करणाऱ्या महिला किंवा लहान मुलांसह फिरणाऱ्या कुटुंबांसाठी दुबई हे सर्वात विश्वासार्ह ठिकाण ठरते.
advertisement
8/9
7. थरार आणि मनोरंजन (Adventure & Culture)वाळवंटातील 'डेझर्ट सफारी', वाळूच्या ढिगाऱ्यांवरून गाडी चालवणे (Dune Bashing), बेली डान्स आणि रात्रीचे कॅम्पिंग पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. यासोबतच 'मिरेकल गार्डन' मधील फुलांची सजावट इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी परफेक्ट जागा ठरते.
advertisement
9/9
8. प्रगत कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानदुबईची मेट्रो सेवा जगातील सर्वात अत्याधुनिक मानली जाते. चालकाशिवाय चालणारी ही मेट्रो आणि तिथली शिस्तबद्ध टॅक्सी सेवा यामुळे पर्यटकांना शहरात फिरताना कधीही त्रास होत नाही. प्रत्येक ठिकाणी मिळणारं हाय-स्पीड फ्री वाय-फाय पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर करतं.थोडक्यात काय तर, कमी वेळ, सोपा व्हिसा, सुरक्षितता आणि भारतीय संस्कृतीशी असलेलं नातं यामुळेच दुबई हे भारतीय पर्यटकांचं 'फेव्हरेट' डेस्टिनेशन बनलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
विदेशी फिरण्यासाठी भारतीयांची पहिली पसंती दुबईच का? एक दोन नाही यामागे आहेत 8 मोठी कारणं