Digital Sunset : झोपण्यासाठीही वेगळा नियम? पाहा नेमका काय आहे Gen Z चा नवा 'डिजिटल सनसेट' ट्रेंड..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What Is Digital Sunset : जेन झीचे नवे नवे ट्रेंड्स आणि त्यांची नावं खूप वेगळी आहेत. मात्र त्यांचे विचार बऱ्यापैकी स्पष्ट आणि विचार पडखड असतात. ते प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिकल अँगलने पाहतात आणि त्याचा वापर करून आयुष्यात सुखी राहतात. नात्यांबद्दलच्या त्यांच्या ट्रेंडबद्दल तर आपल्याला माहीतच असेल पण आज आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत आहोत.
advertisement
1/7

हल्ली सर्वांचं आयुष्य खूप धावपळीचं आणि व्यस्त झालं आहे. त्यातही मोबाईलचा वापर एवढा असतो की काम आणि मोबाईल याच्यानंतर आयुष्यात फार वेळच मिळत नाही. खाण्यापिण्याचं तर हल्ली सर्वांचंच गणित बिघडलेलं आहे. मात्र झोपेचंही काही वेगळं नाही.
advertisement
2/7
हल्ली झोपेच्याही वेळा सर्वांच्या खूप वेगवेगळ्या झाल्या आहेत आणि झोपही पुरेशी होत नाही. काम आणि आयुष्यातील ताणतणाव याला कारण आहेतच मात्र आणखी एक कारण आहे. ते म्हणजे रिल्स पाहणं.
advertisement
3/7
रिल्स पाहताना इतका वेळ जातो की झोपायला फार वेळ राहत नाही आणि सारखी स्क्रीन पाहिल्याने झोपही लवकर लागत नाही. यावरच जेन झींनी एक भन्नाट उपाय काढला आहे. तो म्हणजे डिजिटल सनसेट.
advertisement
4/7
डिजिटल सनसेट म्हणजे झोपण्यापूर्वी काही तास आधी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टीव्ही सारख्या स्क्रीन बंद करणे. यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. जेन झींच्या मते, यामुळे तणाव कमी होतो आणि ते रिचार्ज होतात.
advertisement
5/7
ज्यांना रिल्स पाहण्याची खूप सवय आहे, ते लोक आता डिजिटल सनसेटचा ट्रेंड फॉलो करत आहेत. यामध्ये झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी फोन सायलेंट मोडवर टाकला जातो. या वेळेत काहीजण पुस्तक वाचतात, काही ध्यान करतात किंवा शांत संगीत ऐकतात, तर काही लोक कुटुंबियांसोबत वेळ घालवतात.
advertisement
6/7
डिजिटल सनसेटमुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र सुधारते. अनेक तरुणांनी याबद्दल सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. त्यांच्यामते, लवकर झोपल्याने सकाळी उठल्यावर त्यांना जास्त फ्रेश वाटते. काहींच्या मते, डिजिटल सनसेट झोपेसोबतच मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
advertisement
7/7
झोपेच्या वेळेत जास्त काळ मोबाईल पाहिल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जसे डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणं. पण डिजिटल सनसेट यावर उत्तम उपाय आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना विश्रांती मिळते आणि तुमचा मेंदू शांत होतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Digital Sunset : झोपण्यासाठीही वेगळा नियम? पाहा नेमका काय आहे Gen Z चा नवा 'डिजिटल सनसेट' ट्रेंड..!