TRENDING:

Hingoli: 'शिवशक्ती' लिहून जिच्यावर पोट भरलं, तिच्याच केबिनमध्ये अडकून शिंदेंनी जग सोडलं, हृदयद्रावक घटनेचे PHOTOS

Last Updated:
अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या साह्याने बाहेर काढत असताना क्रेनची देखील वायर तुटल्या गेली. यात पुन्हा एकदा हा टेम्पो पाण्यामध्ये कोसळला होता. (मनिष खरात, प्रतिनिधी)
advertisement
1/7
'शिवशक्ती' लिहून जिच्यावर पोट भरलं, तिच्याच केबिनमध्ये अडकून शिंदेंनी जग सोडलं
हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेनगाव-जिंतूर महामार्गावर येलदरी धरणाच्या पुलावरून पिकअप व्हॅन नदीत कोसळल्याची घटना घडली. याा दुर्घटनेत चालकाला वेळीच बाहेर न येताा आल्यामुळे पिकअप व्हॅनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाला.
advertisement
2/7
हिंगोलीच्या सेनगाव ते जिंतूरकडे जाणाऱ्या महामार्गावर येलदरी धरणाच्या नजीक अरुंद पुलावरून एक टेम्पो नदीमध्ये कोसळला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
advertisement
3/7
माल वाहतूक करणारी पिकअप व्हॅन येलदरी नदीच्या अरुंद पुलावर जात असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पिकअप थेट नदीत कोसळला.
advertisement
4/7
दरम्यान या टेम्पोमध्ये असलेला चालक पाण्यात टेम्पोमध्येच अडकला गेल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंकुश शिंदे असं मयत चालकाचे नाव आहे.
advertisement
5/7
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या साह्याने बाहेर काढत असताना क्रेनची देखील वायर तुटल्या गेली. यात पुन्हा एकदा हा टेम्पो पाण्यामध्ये कोसळला .
advertisement
6/7
क्रेनची केबल तुटल्यामुळे टेम्पो नदीत कोसळला, पण सुदैवाने पुन्हा कुणाला काही दुखापत झाली नाही. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. अखेरीस ३ तासांच्याा प्रयत्नानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातग्रस्त पिकअप व्हॅन सुद्धा बाहेर काढण्यात आली आहे.
advertisement
7/7
या अपघातामुळे काही काळ पुलावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Hingoli: 'शिवशक्ती' लिहून जिच्यावर पोट भरलं, तिच्याच केबिनमध्ये अडकून शिंदेंनी जग सोडलं, हृदयद्रावक घटनेचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल