IND vs ENG : सेमी फायनलआधीच इंग्लंड घाबरली, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूने झोप उडवली, कॅप्टनने प्रेसमध्ये भीती बोलून दाखवली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सेमी फायनल सामन्याआधी इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक याची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत हॅरी ब्रुक भारताच्या खेळाडूला घाबरलेला दिसला.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपमध्ये उद्या 5 मार्च 2026 ला भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/7
मुंबईच्या वानखेडेवर जो संघ जिंकेल तो थेट फायनलला पोहोचणार आहे.त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघापैकी एकाला फायनलला पोहोचण्याची संधी आहे.
advertisement
3/7
सेमी फायनल सामन्याआधी इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक याची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत हॅरी ब्रुक भारताच्या खेळाडूला घाबरलेला दिसला.
advertisement
4/7
आमच्यापैकी बहुतेकांसाठी वर्ल्ड कप उपांत्य फेरीत भारता विरुद्ध भारतात खेळणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही काही चांगले क्रिकेट खेळले आहे. आशा आहे की उद्या आमचा खेळ परिपूर्ण असेल आणि आम्ही मोकळेपणाने खेळू, असे हॅरी ब्रुक म्हणाला आहे.
advertisement
5/7
इंग्लंडची फिरकी गोलंदाजांविरूद्ध कामगिरी नेहमीच खराब राहिली आहे. तरी आम्ही कोलंबोमध्ये 6 विजय मिळवले आहेत. तसेच टीम इंडियाचा वरूण चक्रवर्ती हा जगातला अव्वल दर्जाचा स्पिनर गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या विरूद्ध खेळणे आव्हानात्मक असणार आहे, असे हॅरी ब्रुक म्हणाला आहे.
advertisement
6/7
त्यामुळे एकंदरीत काय तर वरूण चक्रवर्तीला इंग्लंड टीम प्रचंड घाबरली असल्याचे समजते. तसेच चक्रवर्ती विरूद्ध आम्ही सर्वोत्तम तयारी करू असे देखील इंग्लंडचा कॅप्टन बोलला आहे.
advertisement
7/7
आमच्याकडे काही खूप चांगले फिरकी गोलंदाज देखील आहेत. त्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. भारताकडे नेहमीच चांगले फिरकी गोलंदाज आहेत आणि आम्ही येथे येण्यापूर्वीच त्यांना खेळण्याचे आव्हान स्वीकारले आहे,असे हॅरी ब्रुक म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : सेमी फायनलआधीच इंग्लंड घाबरली, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूने झोप उडवली, कॅप्टनने प्रेसमध्ये भीती बोलून दाखवली