बँकांना सॅलरी स्लिपसारख्या कागदपत्रांपेक्षा तुमच्याकडे नियमित उत्पन्न आहे का, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणजेच तुमच्या खात्यात नियमित पैसे जमा होतात का आणि तुम्ही वेळेवर ईएमआय भरू शकता का, याची खात्री बँक करून घेते. त्यामुळे सॅलरी स्लिप नसली तरी इतर काही कागदपत्रांच्या आधारेही बँक तुमची आर्थिक क्षमता तपासू शकते.
advertisement
सर्वात महत्त्वाचे कागदपत्र कोणते?
सॅलरी स्लिपपेक्षा अधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे बँक स्टेटमेंट. तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसल्यास बँक सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासते. मागील 6 ते 12 महिन्यांमध्ये तुमच्या खात्यात पैसे कसे जमा झाले, याचा अभ्यास बँक करते. उदाहरणार्थ:- तुम्ही फ्रीलान्स डिझायनर असाल आणि तुम्हाला क्लायंटकडून दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी पैसे मिळत असतील. रकमेतील थोडा फरक असला तरी हा नियमित उत्पन्नाचा पॅटर्न बँकेला दिसतो. यावरून बँक तुम्ही नियमित कमाई करता, असा अंदाज बांधते आणि लोन पात्रतेबाबत चर्चा सुरू होते. मात्र बँक स्टेटमेंटमध्ये फारच कमी जमा रक्कम किंवा अनियमित रोख व्यवहार दिसल्यास कर्ज मंजुरी कठीण होऊ शकते.
आयटीआर ठरू शकतो मोठा आधार
अनेक कर्जदार इनकम टॅक्स रिटर्नचे (ITR) महत्त्व कमी लेखतात. प्रत्यक्षात सॅलरी स्लिप नसल्यास आयटीआर हा अत्यंत उपयुक्त दस्तऐवज ठरू शकतो. जर तुम्ही नियमितपणे आयकर रिटर्न भरत असाल, तर बँक मागील दोन ते तीन वर्षांतील तुमची घोषित कमाई पाहू शकते. उदाहरणार्थ:- तुमच्या आयटीआरमध्ये वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले असेल, तर बँकेकडे तुमच्या कमाईचा स्पष्ट आधार उपलब्ध होतो. अनेक वेळा हा दस्तऐवज सॅलरी स्लिपची जागा घेऊ शकतो.
व्यवसायिकांना द्यावे लागतात अतिरिक्त कागदपत्रे
जर तुम्ही छोटा व्यवसाय चालवत असाल, तर बँक तुमच्याकडून जीएसटी फायलिंग, इनव्हॉइस किंवा मूलभूत आर्थिक स्टेटमेंट्सची मागणी करू शकते. या कागदपत्रांमधून तुमचा व्यवसाय किती उत्पन्न मिळवत आहे आणि तो किती स्थिर आहे, याचा अंदाज बँकेला येतो. डॉक्टर, सल्लागार (कन्सल्टंट) किंवा आर्किटेक्टसारख्या व्यावसायिकांकडून कधी कधी क्लायंट करार किंवा बिलिंग रेकॉर्डही मागितले जातात. हे कागदपत्र सॅलरी स्लिपसारखे नसले तरी त्यामागचा उद्देश तोच असतो म्हणजे तुमचे उत्पन्न सिद्ध करणे.
सिक्योर्ड लोनने होऊ शकते सोय
जर उत्पन्नाचे ठोस पुरावे कमी असतील, तर सिक्योर्ड लोन घेणे सोपे ठरू शकते. उदाहरणार्थ:-गोल्ड लोन किंवा मालमत्तेच्या बदल्यात घेतलेले कर्ज. अशा कर्जांमध्ये तुमच्या उत्पन्नापेक्षा तुम्ही गहाण ठेवलेल्या मालमत्तेची किंमत अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे उत्पन्नाचा पुरावा कमी असला तरी अशा प्रकारचे कर्ज मिळणे तुलनेने सोपे होते.
