TRENDING:

Weather Alert: पारा चढणार की अवकाळी झोडपणार? ठाणे, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
पारा चढणार की अवकाळी झोडपणार? ठाणे, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?
महाराष्ट्रात सध्या हवामान झपाट्याने बदलत असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. सध्या अवकाळी पावसाचे संकट टळले तरी राज्यात कमाल तापमान 2 -3 अंशाने वाढणार असून किमान तापमानही सामान्य पेक्षा जास्त राहील. विशेषतः मुबंईसह कोकण किणारपट्टीत अंशतः ढगाळ व कोरडे वातावरण राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली भागातील हवामानाची स्थिती कशी असेल? जाणून घेऊयात.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान उष्ण व दमट राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमानात 2 अंशाने घट होऊन ते 23 अंश सेल्सिअस राहील. रात्रीच्या वेळी वातावरण सुखावह असेल. दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवेल. शक्यतो गरज नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून कालपर्यंत स्थिर असलेले कमाल तापमान आज 33-35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. दुपारी कडक ऊन आणि उकाडा जाणवेल. वातावरण बदलामुळे पुढील काही दिवस स्वतः सोबत कुटुंबाची काळजी घ्या.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण, कोरडे आणि स्वच्छ राहील. तापमानात अधिक वाढ होणार असून, किमान तापमान 21-23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34-36 अंश सेल्सिअस राहील. ज्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागून दुपारी अधिक चटके जाणवतील.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल. कमाल तापमान 32-34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20-22 अंश सेल्सिअस असेल. तसेच मुरबाड व शहापूर तालुक्यातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33-34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19-20 अंश सेल्सिअस असेल. एकंदरीत दिवस सुखद पण दुपारच्या वेळी उष्ण असेल त्यामुळे यावेळेत बाहेर पडणे शक्यतो टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: पारा चढणार की अवकाळी झोडपणार? ठाणे, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल