Weather Alert: पुण्यात पुन्हा हवापालट, आज पाऊस नव्हे, वेगळाच अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert in Pune: पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत आहेत. शिमग्याच्या आधीच थंडीचा जोर ओसरला असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशातच गेल्या 3-4 दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा हवापालट झाली असून हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. 26 फेब्रुवारी रोजीचं पुण्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
पुण्यात देखील गेल्या 3-4 दिवसांत हवामान ढगाळ राहिले होते. तसेच काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. परंतु, आज आकाश मुख्यत: निरभ्र ते अंशत: ढगाळ राहील. दुपारी किंवा संध्याकाळी काही प्रमाणात ढगाळ हवामान होऊ शकते. पावसाची शक्यता कमी आहे.
advertisement
3/5
पुण्यात देखील थंडीची तीव्रता कमी झाली असून तापमानात वाढ जाणवत आहे. कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर गेला असून किमान तापमान 15-18 अंश सेल्सिअसवर आहे. सकाळी आणि संध्याकाही काही प्रमाणात गारठा जाणवत असून दुपारी मात्र उकाडा वाढत आहे.
advertisement
4/5
तापमानात वाढ झाल्याने पुणेकरांना बाहेर पडताना काळजी घ्यावी लागेल. सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यासाठी सनस्क्रीन आणि टोपी अवश्य वापरावी. आज हवेची गुणवत्ता मध्यम राहील. तसेच काही भागात प्रदुषण जाणवू शकते. त्यामुळे संवेदनशील लोकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/5
दरम्यान, उन्हाळ्याची चाहुल लागली असून पुण्यात दिवसेदिवस पारा चढत आहे. पुढील 2 दिवसांत कमाल तापमान 2-3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात पावसाचा कोणताही इशारा नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुण्यात पुन्हा हवापालट, आज पाऊस नव्हे, वेगळाच अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!