TRENDING:

'तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला...', हिंदी इंडस्ट्रीतील वागणूकीवर स्पष्टच बोलली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

Last Updated:
Marathi actress in Hindi TV: हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना खरोखर दुय्यम वागवणूक मिळते का? या प्रश्नावर या मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने अत्यंत सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
1/8
हिंदी इंडस्ट्रीतील वागणूकीवर स्पष्टच बोलली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री
ओटीटी </a>आणि ग्लॅमरच्या जगात टीव्ही मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला, तरी हे माध्यम आजही हजारो हातांना काम देतंय." width="1080" height="1439" /> आजच्या ओटीटी आणि ग्लॅमरच्या जगात टीव्ही मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला, तरी हे माध्यम आजही हजारो हातांना काम देतंय.
advertisement
2/8
स्टार प्लसवरील 'उडने की आशा' या मालिकेत 'रेणुका' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री राधिका हर्षे-विद्यासागर सध्या आपल्या अभिनयाने हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पण, हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना खरोखर दुय्यम वागवणूक मिळते का? या प्रश्नावर राधिका यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
3/8
अनेकांचा असा समज असतो की, हिंदीत काम करताना प्रादेशिक भेदभाव होतो. मात्र, राधिका सांगतात, "तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला बाजूला टाकलं जातं, हा निव्वळ गैरसमज आहे. तिथे तुमची गुणवत्ता आणि तुमचा आत्मविश्वास बोलतो."
advertisement
4/8
त्या पुढे म्हणाल्या, "माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मला कधीही असा दुजाभाव जाणवला नाही. उलट, रोहिणी हटंगडी, पवन मल्होत्रा यांसारख्या दिग्गजांसोबत काम करताना खूप शिकायला मिळालं. मी आजवर २५-३० जाहिराती आणि अनेक हिंदी-मराठी मालिका केल्या, पण सगळीकडे कामाचा सन्मानच झाला."
advertisement
5/8
राधिका यांचा प्रवास थक्क करणारा आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून इतिहासात बीए आणि रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्मन भाषेचं शिक्षण घेणाऱ्या राधिका यांच्या घरात उच्चशिक्षितांची परंपरा आहे. घरातील सर्वांना वाटलेलं की त्या शैक्षणिक क्षेत्रातच करिअर करतील, पण राधिका यांनी अभिनयाची वाट निवडली.
advertisement
6/8
'शहनाई' ही त्यांची पहिली मालिका. सुधीर जोशींच्या ओळखीमुळे त्यांना बोमण इराणी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या टीव्हीवरील प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
advertisement
7/8
मालिकांच्या सेटवरचे कामाचे तास आणि मानधनाबद्दल राधिका यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. त्या म्हणतात, "टीव्ही हे माध्यम तुमची परीक्षा घेतं. मी सलग दोन वर्ष रोज १४ तास काम केलं आहे. कलाकार थकतात, हे मान्य करायला हवं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, कलाकारांनी केलेल्या कष्टाचं मानधन त्यांना वेळेत मिळायला हवं. कुणीही मानधन देताना कारणं देऊ नयेत, कारण त्या मागे कलाकाराची अतोनात मेहनत असते."
advertisement
8/8
हिंदी मालिकांमधील ओव्हर-द-टॉप मेकअप आणि दागदागिन्यांवर नेहमीच टीका होते. यावर राधिका म्हणतात, "स्वयंपाकघरात काम करणारी स्त्री जर मेकअपमध्ये दिसत असेल आणि लोक ती मालिका बघत असतील, तर तो प्रेक्षकांचाही दोष आहे ना? पण एकता कपूरसारख्या निर्मात्यांनी या इंडस्ट्रीला जे स्थैर्य दिलं आणि हजारो तंत्रज्ञांना काम दिलं, ते नाकारून चालणार नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला...', हिंदी इंडस्ट्रीतील वागणूकीवर स्पष्टच बोलली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल