Team India : ना अभिषेक, ना तिलक... वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा 'खलनायक', 29 बॉल खेळून केले 24 रन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे.
advertisement
1/8

सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला, त्यामुळे आता टीम इंडियासाठी गुरूवारी झिम्बाब्वेविरुद्ध होणारा सामना करो या मरो चा आहे. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
2/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यातल्या 4 मॅचमध्ये टीम इंडिया विजयी झाली, पण या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या बॅटरनी निराशाजनक कामगिरी केली, त्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल व्हायची शक्यता आहे.
advertisement
3/8
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा हा सध्या सगळ्यात जास्त टार्गेट होत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या 4 सामन्यांपैकी अभिषेक 3 सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 केले, पण यातही त्याला संघर्ष करावा लागला.
advertisement
4/8
अभिषेक शर्मानंतर तिलक वर्माही निशाण्यावर आला आहे, कारण तोदेखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. तिलकने 5 इनिंगमध्ये 21.40 च्या सरासरीने आणि 118.88 च्या स्ट्राईक रेटने 107 रन केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या खेळाडूसाठी हे आकडे निराशाजनक आहेत.
advertisement
5/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टिकून खेळण्याची आवश्यकता असतानाही तिलकने बेजबाबदार शॉट खेळला, ज्यामुळे टीम आणखी अडचणीत आली. मॅचनंतर महान क्रिकेटर सुनिल गावसकर यांनीही तिलक वर्माच्या बॅटिंगवर टीका केली.
advertisement
6/8
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यावर चर्चा होत असतानाच रिंकू सिंगच्या कामगिरीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. रिंकू सिंगने या वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच खेळल्या, यात त्याने 29 बॉल खेळून फक्त 24 रन केल्या आहेत.
advertisement
7/8
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात रिंकून 14 बॉलमध्ये 6 रन, नामिबियाविरुद्ध 6 बॉलमध्ये 1 रन, पाकिस्तानविरुद्ध 4 बॉलमध्ये नाबाद 11 रन आणि नेदरलँड्सविरुद्ध 3 बॉलमध्ये नाबाद 6 रन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिंकू 2 बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
8/8
रिंकू सिंगची टीम इंडियामध्ये निवड फिनिशर म्हणून झाली आहे, पण टी-20 वर्ल्ड कपचा एकही सामना रिंकूला फिनिश करता आलेला नाही, त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : ना अभिषेक, ना तिलक... वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा 'खलनायक', 29 बॉल खेळून केले 24 रन