TRENDING:

Monthly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; मार्चमध्ये कोणाला सूर गवसणार? भाग्योदय

Last Updated:
Monthly Horoscope: लवकरच सालातील तिसरा मार्च महिना सुरू होत आहे. बहुतेक राशींसाठी संमिश्र फळ देणारा ठरेल. या महिन्यात यश मिळवण्यासाठी कष्ट, संयम आणि योग्य निर्णयांची जोड द्यावी लागेल. महिन्याची सुरुवात अनेकांसाठी सकारात्मक असेल करिअरमध्ये नवीन संधी आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मार्च महिन्याचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/7
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; मार्चमध्ये कोणाला सूर गवसणार?
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी मार्चची सुरुवात यश घेऊन येईल. करिअर किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठी ऑफर मिळू शकते. तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही समाजात आपली वेगळी ओळख निर्माण कराल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे भविष्यात मोठ्या प्रोजेक्टशी जोडले जाण्याची संधी मिळेल. दुसऱ्या आठवड्यात मात्र विरोधकांपासून सावध राहा, ते तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवावी. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. महिन्याच्या मध्यात परिस्थिती पुन्हा तुमच्या बाजूने येईल आणि नोकरीत बढतीचे योग येतील. तुमचं नशीब सूर्यासारखं चमकेल. फक्त चौथ्या आठवड्यात घाईत गाडी चालवू नका, दुखापत होण्याची शक्यता आहे. नवीन मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं. जोडीदारासोबत तीर्थयात्रेचे योग आहेत.
advertisement
2/7
मकर - मकर राशीसाठी मार्च महिना सुख-दुःखाचा संमिश्र अनुभव देईल. सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे थोडी चिंता वाटेल. कामाच्या ठिकाणी काही बदल होतील, ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जवळच्या मित्रांच्या मदतीने तुम्ही आव्हानांवर मात कराल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चढ-उतारांचा असेल, अचानक आलेल्या मोठ्या खर्चामुळे बजेट कोलमडू शकतं. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल, जो फायदेशीर ठरेल. 
advertisement
3/7
मकर - जमिनीचे वाद एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने सुटतील. महिन्याच्या मध्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागेल. गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तरार्धात यश मिळेल. घरात एखादी चैनीची वस्तू येईल, ज्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात, अफवांवर विश्वास न ठेवता जोडीदाराशी संवाद साधा. वैवाहिक नातं मधुर राहील.
advertisement
4/7
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना संमिश्र असेल. सुरुवातीला ऑफिसमधील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. तुमच्या रागीट वागण्यामुळे जवळची माणसं दुरावू शकतात, त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा. दुसऱ्या आठवड्यात कामाचा ताण वाढेल आणि प्रवास थकवणारे होतील. कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. महिन्याच्या मध्यात अचानक मोठं यश मिळण्याचे योग आहेत. एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
5/7
कुंभ - परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जमीन खरेदी-विक्रीतून लाभ होईल आणि व्यवसायात हवा तसा नफा मिळेल. उत्तरार्धात एखादी मोठी समस्या सुटल्यामुळे मोकळा श्वास घेता येईल. वडिलांची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंधांतील जुने वाद मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक आयुष्य सुखी असेल आणि जोडीदार प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहील. आरोग्य सामान्य राहील.
advertisement
6/7
मीन - मीन राशीसाठी मार्च महिना चढ-उतारांचा असेल. करिअर आणि व्यवसायात सुरुवातीला आव्हाने येतील, पण जवळचे लोक तुमच्या मदतीला उभे राहतील. सहकाऱ्यांच्या मदतीने कामं वेळेत पूर्ण होतील. जमिनीच्या वादांमुळे मन चिंतेत राहील आणि प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यशासाठी जादा कष्ट घ्यावे लागतील. दुसऱ्या आठवड्यात थोडा दिलासा मिळेल आणि अडचणी कमी होतील.
advertisement
7/7
मीन -नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. महिन्याच्या मध्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. कुटुंबात एखाद्या विषयावरून वाद होऊ शकतात, जो सोडवण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे अस्वस्थता जाणवेल. प्रेमसंबंध टिकवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा मान ठेवा आणि स्वतःहून पुढाकार घेऊन गैरसमज दूर करा. जोडीदारासाठी वेळ काढणं गरजेचं आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Monthly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; मार्चमध्ये कोणाला सूर गवसणार? भाग्योदय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल