मित्रांनी कमाल केली, ४ एकरात स्ट्रॉबेरी फुलवली, बुलढाण्यात चमत्कार! ६० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
थंड हवेचे बुलढाणा स्ट्रॉबेरी शेतीसाठी पोषक असल्याचे ओळखून चार मित्रांनी एकत्र येऊन कमाल केली.
advertisement
1/5

कृषीप्रधान बुलढाणा जिल्हा सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, सरकारच्या अनिश्चित धोरणामुळे शेतमालाचे पडलेले भाव आणि यातून होणारे शेतकऱ्याचे नुकसान, ही आजवरची स्थिती राहिलेली आहे.
advertisement
2/5
ही वास्तविकता जाणून घेत चार उच्चशिक्षित मित्रांनी मिळून एकाच्या चार एकरातील शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केला.
advertisement
3/5
शहराच्या हाकेच्या अंतरावर आणि अजिंठा मार्गावर ऋत्विक सुरेश जतकर यांचे हे शेत आहे. स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करणारे चारही मित्र वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित आहेत. कुणी इंजिनियर, कुणी बीएससी ऍग्री तर कुणी मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित..
advertisement
4/5
काही दिवसांपूर्वी हे चारही मित्र गप्पा करत असताना शेतीतून काहीतरी नवी करू! असे त्यांनी ठरविले होते. केवळ चर्चा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणीला लगोलग सुरुवात केली.
advertisement
5/5
सातत्याने पिकांचे निरीक्षण, रोगराई टाळण्यासाठी कीटकनाशके बाजारात स्ट्रॉबेरी पोहोचवण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था, यासह विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीपासून जवळपास १५ लाख रुपयांचा खर्च झाला. कामाची व्याप्ती पाहता, वर्षभरात साधारणतः ६० लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा तरुणांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मित्रांनी कमाल केली, ४ एकरात स्ट्रॉबेरी फुलवली, बुलढाण्यात चमत्कार! ६० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा