Wi-Fi ची स्पिड स्लो करतेय तुमच्या किचनमधील ही वस्तू; 99 टक्के लोकांना 'हे' सायन्स माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नेटवर्क फुल आहे, वायफाय सुरू आहे, तरीही किचनच्या जवळ जाताच व्हिडिओ का अडकतो? याचं उत्तर तुमच्या स्वयंपाकघरातील एका आधुनिक यंत्रात दडलं आहे
advertisement
1/7

घरी वायफाय असला की अनेक गोष्टी सोप्या होतात. पण कधीकधी जेव्हा हाय वायफाय घरातील काही कोपऱ्यांमध्ये पकडत नाही तेव्हा डोकेदुखी ठरतं. तुम्ही बेडरूममध्ये आरामात बसून तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा थरार अनुभवत आहात किंवा युट्युबवर एखादा महत्त्वाचा व्हिडिओ पाहत आहात. पाणी पिण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी तुम्ही मोबाईल हातात घेऊनच किचनच्या दिशेने जाता आणि अचानक... स्क्रीनवर तो गोल फिरणारा 'बफरिंग'चा सिम्बॉल येतो.
advertisement
2/7
नेटवर्क फुल आहे, वायफाय सुरू आहे, तरीही किचनच्या जवळ जाताच व्हिडिओ का अडकतो? याचं उत्तर तुमच्या स्वयंपाकघरातील एका आधुनिक यंत्रात दडलं आहे आणि ते यंत्र म्हणजे 'मायक्रोवेव्ह ओव्हन' (Microwave Oven). आता तुम्हाला वाटेल की, जेवण गरम करणाऱ्या मायक्रोवेव्हचा आणि माझ्या इंटरनेटचा काय संबंध? पण यामागे एक रंजक विज्ञान आहे. चला तर मग, हे 'कनेक्शन' नक्की काय आहे ते समजून घेऊया.
advertisement
3/7
'बफरिंग' मागे मायक्रोवेव्हचा हात कसा?जेव्हा तुम्ही मायक्रोवेव्ह सुरू करता, तेव्हा त्यातून अन्न गरम करण्यासाठी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज' (Electromagnetic Waves) बाहेर पडतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, बहुतांश मायक्रोवेव्ह 2.45 GHz (गिगा हर्ट्झ) या फ्रिक्वेन्सीवर काम करतात. योगायोगाने, आपल्या घरातील जुने किंवा सामान्य वायफाय राऊटर (WiFi Router) देखील याच 2.4 GHz बँडवर सिग्नल पाठवत असतात.
advertisement
4/7
आता होतं असं की, मायक्रोवेव्ह आणि वायफाय एकाच 'रस्त्यावरून' (बँडवरून) प्रवास करत असल्यामुळे त्यांचे सिग्नल्स एकमेकांमध्ये मिसळतात किंवा ओव्हरलॅप होतात. यालाच तांत्रिक भाषेत 'इंटरफेरन्स' (Interference) असं म्हणतात.
advertisement
5/7
वायफायवरच परिणाम का होतो?तुम्ही विचार कराल की, मग वायफायमुळे मायक्रोवेव्हवर परिणाम का होत नाही? त्याचं उत्तर आहे 'पॉवर'. मायक्रोवेव्हमधून बाहेर पडणारी रेडिएशन ही वायफाय राऊटरच्या सिग्नलपेक्षा तब्बल 1,000 पटीने जास्त शक्तिशाली असते. त्यामुळे जेव्हा हे दोन्ही सिग्नल्स समोरासमोर येतात, तेव्हा शक्तिशाली मायक्रोवेव्ह रेडिएशन वायफायच्या कमकुवत सिग्नलला अक्षरशः दाबून टाकते. परिणामी, तुमचं इंटरनेट स्लो होतं किंवा व्हिडिओ बफर होऊ लागतो.
advertisement
6/7
इंटरनेटची गती कायम राखण्यासाठी 'या' टिप्स फॉलो कराजर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. काही साधे बदल करून तुम्ही हे टाळू शकता:1. राऊटरची जागा बदला: तुमचा वायफाय राऊटर मायक्रोवेव्हपासून शक्य तितक्या लांब ठेवा. या दोघांमध्ये जेवढं जास्त अंतर असेल, तेवढा इंटरफेरन्स कमी होईल.2. दरवाजा नीट तपासा: मायक्रोवेव्हचे हिंज (Hinges) किंवा दरवाजाची सील तुटलेली नाही ना, याची खात्री करा. जर दरवाजा नीट बंद होत नसेल, तर रेडिएशन जास्त प्रमाणात लीक होऊन इंटरनेटला अडथळा आणू शकते.3. 5 GHz बँडचा वापर: जर तुमच्याकडे 'ड्युअल बँड' राऊटर असेल, तर तुमचे डिव्हाईस 5 GHz बँडवर कनेक्ट करा. हा बँड मायक्रोवेव्हच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळा असल्यामुळे इंटरनेट विना अडथळा चालेल.
advertisement
7/7
तंत्रज्ञानाच्या या जगात प्रत्येक यंत्राची एक वेगळी 'भाषा' असते. जेव्हा दोन यंत्रे एकाच भाषेत बोलू लागतात, तेव्हा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. त्यामुळे पुढच्या वेळी किचनमध्ये व्हिडिओ अडकला, तर समजून जा की तुमचा मायक्रोवेव्ह तुमच्या वायफायच्या कामात लुडबूड करतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Wi-Fi ची स्पिड स्लो करतेय तुमच्या किचनमधील ही वस्तू; 99 टक्के लोकांना 'हे' सायन्स माहितच नाही