Rajpal Yadav: 'या' फिल्ममुळे निघालं राजपाल यादवचं दिवाळ! क्षणात फिरले दिवस, अभिनेता तिहार तुरुंगात कैद
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav Controversy: साध्या आणि विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना लोटपोट करणाऱ्या राजपाल यादव यांच्या आयुष्यात अत्यंत धक्कादायक वळण आलं आहे.
advertisement
1/10

ज्यांच्या नुसत्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी प्रेक्षकांच्या ओठांवर हास्य उमटतं, तेच राजपाल यादव आज आर्थिक समस्येत अडकले आहेत. साध्या आणि विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना लोटपोट करणाऱ्या राजपाल यादव यांच्या आयुष्यात अत्यंत धक्कादायक वळण आलं आहे.
advertisement
2/10
अभिनेता म्हणून यशाच्या शिखरावर असताना दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पाहणं राजपाल यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. आज राजपाल यादव हे दिल्लीच्या तिहार जेलच्या तुरुंगात असून, शरणागती पत्करण्यापूर्वी त्यांनी दिलेला जबाब ऐकून अख्खं बॉलीवूड हळहळलं आहे.
advertisement
3/10
२०१० मध्ये राजपाल यादव यांच्या संकटाची सुरुवात झाली. स्वतःची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला 'अता पता लापता' हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपये कर्ज घेतलं होतं.
advertisement
4/10
हा एक म्युझिकल सटायर चित्रपट होता, ज्यामध्ये विजय राज, ओम पुरी, आशुतोष राणा यांसारखे दिग्गज कलाकार होते. राजपाल यांनी या सिनेमात आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. नोव्हेंबर २०१२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर तो सपशेल आपटला.
advertisement
5/10
सुमारे ११ कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने केवळ ४२ लाख रुपये कमावले. हा एक मोठा डिजास्टर ठरला. कर्जाचे हप्ते थकले, व्याज वाढत गेलं आणि रक्कम ९ कोटींवर पोहोचली. चेक बाऊन्स झाल्यामुळे राजपाल यांच्यावर गुन्हेगारी खटला चालला आणि शेवटी त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे.
advertisement
6/10
तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यांनी एका मुलाखतीत आपलं दुःख मांडलं. ते म्हणाले, "सर, माझ्याकडे आता पैसे उरलेले नाहीत. कोणताही पर्याय समोर दिसत नाहीये. इथे आपण सगळे एकटे आहोत, कोणीही मित्र नसतो. मला या संकटाचा सामना एकट्यालाच करावा लागणार आहे."
advertisement
7/10
राजपाल यादव यांच्या या विधानानंतर सोनू सूद याने मदतीचा हात पुढे केला असला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणं राजपाल यांच्यासाठी कठीण झालं आहे.
advertisement
8/10
जेव्हा २०१२ मध्ये 'अता पता लापता'चा म्युझिक लॉन्च झाला, तेव्हा अमिताभ बच्चन स्वतः तिथे उपस्थित होते. बिग बींनी राजपालच्या संघर्षाचं कौतुक करत त्यांना कष्टाळू कलाकार म्हटलं होतं.
advertisement
9/10
राजपाल यांनीही तेव्हा बिग बींना 'भीष्म पितामह' म्हणत त्यांचे पाय धरले होते. ज्या सिनेमाचं कौतुक महानायकाने केलं, त्याच सिनेमाने राजपाल यांना उद्ध्वस्त केलं, हे सिनेसृष्टीतील सर्वात मोठं दुर्दैव मानलं जातंय.
advertisement
10/10
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करणार आहेत. अक्षय कुमारसोबतचा त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत बंगला' एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. राजपाल या संकटातून सावरतील आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवतील, अशी आशा त्यांचे चाहते करत आहेत.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rajpal Yadav: 'या' फिल्ममुळे निघालं राजपाल यादवचं दिवाळ! क्षणात फिरले दिवस, अभिनेता तिहार तुरुंगात कैद