TRENDING:

AFG vs SA : 2 SUPER OVER, शेवटचे 24 बॉल, कधी न पाहिलेला ड्रामा, थरारक सामन्यात नेमकं काय घडलं?

Last Updated:

सामन्यात दोन्ही संघाने 187 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सूटल्याने सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला होता. या दरम्यान भयंकर ड्रामा आणि थरार पाहायला मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Afganistan vs South Africa Super Over : अहमदाबाद: टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात 11 फेब्रुवारी 2026 ही तारीख सर्वांच्या लक्षात राहिल.कारण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अशी मॅच झाली जी आजवर कधीच कोणाला पाहायला मिळाली नाही आहे.क्रिकेट हा अनिश्चिततेचे गेम असल्याचे म्हटले जाते आणि आफगाणिस्तान- दक्षिण आफ्रिकेच्या मॅचने ही अनिश्चितता कोणत्या स्थरावर जाऊ शकते हे दाखवून दिले.या सामन्यात दोन्ही संघाने 187 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सूटल्याने सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला होता. या दरम्यान भयंकर ड्रामा आणि थरार पाहायला मिळाला आहे.त्यामुळे आता दोन सुपर ओव्हर आणि 24 बॉलमध्ये नेमका सामन्याचा निकाल कसा लागला? हे जाणून घेऊयात.
Afganistan vs South Africa Super Over
Afganistan vs South Africa Super Over
advertisement

19 व्या ओव्हरचा ड्रामा

मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 187 धावा केल्या. उत्तरादाखल अफगाणिस्तानने 19.4 षटकात सर्वबाद 187 धावा केल्या.यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहण्याआधी अफगाणिस्तानच्या 20व्या ओव्हरला कमालीचा ड्रामा झाला होता.

20व्या ओव्हरला आफ्रिकेला 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता होती.यावेळी कगिसो रबाडाने पहिलाच बॉल नो टाकला होता.पण नुर अहमदला याचा फायदा घेतला नाही आणि एकही धाव मिळाली नाही.रबाडाने दुसरा बॉल वाईड टाकला.आता तिसरी बॉल (अधिकृत पहिला बॉल)फ्रिहीट होती. पण त्यांनी एकही धाव काढली नाही.

advertisement

अफगाणिस्तानला आता 5 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या. यावेळी रबाडाच्या दुसऱ्या बॉलवर नूर अहमदने सिंक्स मारला होता. त्यामुळे आता चार बॉलमध्ये 5 धावा हव्या होत्या.यावेळी तिसऱ्या बॉलवर एकही धाव आली नाही.

चौथ्या बॉलवर रबाडाने पुन्हा नो बॉल टाकला. या बॉलवर नूर अहमदने 2 धावा काढल्या. अशाप्रकारे तीन धावा मिळाल्या. आता 3 बॉलमध्ये 2 धावा काढायच्या होत्या. यावेळी आफ्रिकेला जिंकण्यासाठी एक विकेटची आवश्यकता होती.यावेळी अफगाणिस्तान 3 बॉलमध्ये 2 धावा हमखास काढू शकली असती. पण चौथ्या बॉलवर नूर अहमद दोन धावा काढायला गेला आणि फारून रन आऊट झाला.त्यामुळे अफगाणिस्तान 187 वर समित राहिली.इतक्याच धावा साऊथ आफ्रिकेने केल्याने हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

advertisement

पहिली सूपर ओव्हर

अफगाणिस्तानकडून अझमत आणि गुरबाज मैदानात उतरले आहेत. तर आफ्रिकेकडून एनगिडी गोलंदाजी आला होता.

पहिला बॉल : लुंगी एनगिडीच्या पहिल्या बॉलवर अझमतने चौकार मारला होता.

दुसरा बॉल : लुंगी एनगिडीच्या पहिल्या बॉलवर अझमतने षटकार मारला होता.

तिसरा बॉल : तिसऱ्या बॉलवर अझमतने एक धाव काढली.

चौथा बॉल : चौथ्या बॉलवर गुरबाजने एक धावा घेतली.

advertisement

पाचवा बॉल : अझमतने चौकार मारला होता.

सहावा बॉल : अझमतने 1 धाव काढली.

अफगाणिस्तान 17 धावा करू शकली होती त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेसमोर समोर 18 धावांचे लक्ष्य होते.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

पहिला बॉल : फारुकीच्या बॉलवर मिलरने 1 धाव काढली.

दुसरा बॉल : डेवाल्ड ब्रेविसने फारूकीच्या बॉलवर षटकार मारला.

advertisement

विजयासाठी 4 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या.

तिसरा बॉल :  फारूकीच्या बॉलवर डेवाल्ड ब्रेविस बाद झाला.

विजयासाठी 3 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या.

चौथा बॉल : ट्रिस्टन स्टब्सने चौकार मारला.

विजयासाठी 2 बॉलमध्ये 7 धावा हव्या होत्या.

पाचवा बॉल :  स्टब्सला एकही धाव काढता आली नाही.

सहाव्या बॉल :  स्टब्सने षटकार मारला होता.

आफ्रिकेने सूद्धा 17 धावा केल्याने हा सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता.

दुसरी सुपर ओव्हर

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिकेने 24 धावा काढल्या होत्या.

पहिला बॉल : अझमत फारुकीच्या पहिल्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्सने षटकार मारला होता.

दुसरा बॉल : अझमत फारुकीच्या दुसऱ्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्सने एक धाव काढली.

तिसरा बॉल : डेविड मिलरने दोन धावा काढल्या.

चौथा बॉल : अझमतने मिलरला षटकार खेचला.

पाचवा बॉल : डेविड मिलरने पुन्हा षटकार मारला.

सहावा बॉल : डेविड मिलरने दोन धावा काढल्या

अफगाणिस्तानसमोर 25 धावांचे लक्ष्य होते.

पहिला बॉल: केशव महाराज पहिल्या बॉलवर एकही धाव आली नाही.

दुसरा बॉल : मोहम्मद नबी आऊट झाला.

तिसरा बॉल : गुरबाजने सिक्स मारला.

चौथा बॉल : गुरबाजने पुन्हा सिक्स मारला.

पाचवा बॉल : गुरबाजने तिसरा सिक्स मारला.

सहावा बॉल :वाईड बॉल टाकला

सहावा बॉल : गुरबाज कॅच आऊट झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
सर्व पहा

अफगाणिस्तान 19 धावा करू शकली होती, त्यामुळे 5 धावांनी साऊथ आफ्रिकेने दुसऱ्या सूपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. हा सामना जवळपास गुरबाजने तीन सिक्स मारून काढला होता. मात्र शेवटचा बॉल त्याला व्यवस्थित मारता न आल्याने त्यांचा पराभव झाला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AFG vs SA : 2 SUPER OVER, शेवटचे 24 बॉल, कधी न पाहिलेला ड्रामा, थरारक सामन्यात नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल