TRENDING:

सोन्यापेक्षा भारी दिसणारी ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!

Last Updated:

कोरियन स्टाइल भारतातही वेगाने लोकप्रिय होत असून याचा थेट परिणाम दागिन्यांच्या बाजारपेठेवर दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या तरुणाईमध्ये कोरियन फॅशन आणि अ‍ॅक्सेसरीजचा जबरदस्त ट्रेंड पाहायला मिळत आहे. के-पॉप, के-ड्रामा आणि सोशल मीडियामुळे कोरियन स्टाइल भारतातही वेगाने लोकप्रिय होत असून याचा थेट परिणाम दागिन्यांच्या बाजारपेठेवर दिसून येत आहे. मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केट परिसरात कोरियन ज्वेलरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
advertisement

क्रॉफर्ड मार्केटमधील एका दुकानात कोरियन स्टाइलच्या चेन्स अवघ्या 150 रुपयांपासून तर इयरिंग्स 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय ब्रासलेट्स 150 ते 350 रुपयांपर्यंत, बाजूबंद 200 रुपयांपासून, तर पायातील अँकलेट्स फक्त 100 रुपयांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कमी किमतीत ट्रेंडी आणि आकर्षक डिझाईन्स मिळत असल्याने ग्राहकांमध्ये या दागिन्यांना मोठी मागणी आहे.

Success Story : शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी, उच्चशिक्षित माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, महिन्याची कमाई तर पाहा

advertisement

या ज्वेलरीची खासियत म्हणजे त्यांची साधी पण एलिगंट डिझाईन, हलके वजन आणि वेस्टर्न तसेच इंडो-वेस्टर्न पोशाखांशी सहज जुळणारी स्टाइल. कॉलेज तरुणी, नोकरी करणाऱ्या महिला तसेच फॅशनप्रेमी ग्राहक मोठ्या संख्येने येथे खरेदीसाठी येत आहेत. सणासुदीच्या काळात तसेच पार्टी वेअर अ‍ॅक्सेसरीज म्हणून या दागिन्यांना विशेष मागणी असल्याचे दुकानदार सांगतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
सर्व पहा

हे दुकान मेन क्रॉफर्ड मार्केटच्या समोर त्याचबरोबर कॅनरा बँकेच्या समोर, अब्दुल रहमान स्ट्रीट येथे स्थित आहे. सहज पोहोचता येणारे ठिकाण आणि विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची सतत वर्दळ असते. अनेक ग्राहक सोशल मीडियावर पाहिलेल्या डिझाईन्ससारखीच ज्वेलरी येथे मिळत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत. एकंदरीत परवडणाऱ्या किमती आणि ट्रेंडी कोरियन डिझाईन्स यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधील ही कोरियन ज्वेलरी सध्या फॅशनप्रेमींमध्ये विशेष चर्चेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सोन्यापेक्षा भारी दिसणारी ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल