Weather Alert: कोकणात वारं फिरलं, बुधवारी येणार संकट; 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
4 मार्च रोजी कोकणातील हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील 4 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 4 मार्च रोजी कोकणातील हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील 4 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
4 मार्च रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस राहील. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/5
सकाळी आणि संध्याकाळीही उकाडा जाणवेल, कारण समुद्रकिनारी भागात आर्द्रता 60-80 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ होईल. त्यामुळे सूर्यप्रकाशात बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी.
advertisement
4/5
उष्णतेच्या लाटेमुळे डिहायड्रेशन, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढतो. पाणी भरपूर प्या, हलके कपडे घाला, थेट सूर्यप्रकाश टाळा आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे कमी करा.
advertisement
5/5
एकंदरीत, 4 मार्चला कोकणात उन्हाचा तडाखा आणि दमट उकाडा जाणवेल. घराबाहेर जाण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा वेळ निवडावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, बुधवारी येणार संकट; 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट