नवी टाटा Punch
विक्रीमध्ये तिसऱ्या स्थानावर टाटा मोटर्सच्या नव्या Tata Punch फेसलिफ्टने बाजी मारली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 18,748 यूनिट्सची विक्री करून Tata Punch तिसऱ्या स्थानावर आहे. Tata Punch च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये दमदार फिचर्स, नवीन लूक आणि CNG ऑटोमॅटिक हा पर्याय दिलाा आहे. त्यामुळे कारच्या विक्रीत वाढ झाली आहे.
टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट
advertisement
Punch आता एक एंट्री लेव्हल SUV राहिली नाही, तर आता ती देशातील टॉप 3 एसयूव्हीमध्ये सामील झाली आहे. 'टाटाची Nexon पहिल्या क्रमांकावर आहे, तर Tata Punch दुसऱ्या स्थानावर आहे.
CRETA चा दबदबा कायम
तर चौथ्या स्थानावर दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Creta आपली जागा अजूनही बनवून आहे. Hyundai Creta चे तब्बल 17,938 यूनिट्स विकले गेले आहेत. Creta आताही 4 मीटरपेक्षा मोठी असणाऱ्या SUV सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम राखून आहे.
तर पाचव्या स्थानावर Maruti Suzuki Brezza आहे. फेब्रुवारी महिन्यात Maruti Suzuki Brezza चे 17,863 च्या यूनिट्सची विक्री झाली आहे. फक्त पेट्रोल इंजिन असलं तरी Brezza चा दबदबा कायम आहे.
SUV विक्री वाढली
दरम्यान, एसयूव्ही आणि ७ सीटर सेगमेंटमध्येही गाड्यांची विक्री वाढली आहे. Maruti Suzuki Ertiga, Swift आणि Wagon R सारख्या गाड्यांची नेहमी सारखी विक्री आहे. सुझुकीकडे जास्त पर्याय असल्यामुळे विक्रीमध्ये नेहमी अव्वल राहिली. पण, टाटा मोटर्सने Tata Punch फेसलिफ्ट मॉडेल आणून मारुतीचा खेळ बदला आहे. आता टॉप 3 मध्ये Tata मोटर्सच्याा दोन SUV ने जागा मिळवली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीय आता ज्या गाडीची उंची जास्त आहे, मजबूत आहे, अशा गाड्यांना पसंती देत असल्याचं स्पष्ट होत आहे.
