APMC Market : शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कृषी मालाची आवक झाली. राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
सांगली : धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कृषी मालाची आवक झाली. राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, लिंबू आणि शेवग्याची आवक आणि भाव पाहूयात.
आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 176 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 160 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 13 क्विंटल आल्यास 3750 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 39 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी कोल्हापूर बाजारात आवक झालेल्या 32 क्विंटल लिंबूस 5000 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल लिंबूस प्रतीनुसार 3500 ते 9000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्यास उठाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 38 क्विंटल शेवग्याची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 20 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास 5750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 9:27 PM IST









