लिफ्ट उघडताच पायाखालची जमीन सरकली, 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, थरकाप उडवणारा Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शहरातल्या पॉश भागातील इमारतीमध्ये लिफ्टच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये माणूस इमारतीमधील लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे.
शहरातल्या पॉश भागातील इमारतीमध्ये लिफ्टच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये माणूस इमारतीमधील लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. लिफ्ट मजल्यावर पोहोचल्यानंतर माणूस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण माणसाने लिफ्टमधून पाय बाहेर काढताच लिफ्ट अचानक हलू लागते आणि तो माणूस स्वतःला सावरण्यासाठी खाली वाकतो, पण तरीही लिफ्टमधून खाली पडतो. इतक्या भीषण अपघातानंतर हा माणसू चमत्कारिकरित्या वाचला आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी वलसाडच्या पॉश परिसरातील तीथल रोडवरील सरदार हाइट्सच्या साबरमती इमारतीत ही घटना घडली. यादरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे, इमारतीतील लिफ्ट अचानक वरच्या दिशेने सरकू लागली आणि त्या माणसाचा जीव धोक्यात आला कारण त्याचा एक पाय दरवाजाच्या बाहेर होता. सुदैवाने, या व्यक्तीचा जीव यात वाचला आहे.
थरारक सीसीटीव्ही
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी 7.22 वाजता तो माणूस लिफ्टमध्ये प्रवेश करतो आणि नंतर लिफ्टचे बटण दाबतो. त्यानंतर तो लिफ्टच्या दाराजवळ उभा राहून वाट पाहत आहे. 7.23 वाजता, त्याच्या इच्छित मजल्यावर पोहोचताच, लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि तो लगेच बाहेर पडण्यासाठी पाय पुढे करतो. पण, दरवाजा उघडल्यानंतर एका सेकंदापेक्षा कमी वेळात, लिफ्ट खूप वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते, त्या माणसाचे डोके वरच्या मजल्यावर आदळते ज्यामुळे तो जमिनीवर पडतो. त्यानंतर तीन सेकंदांनी लिफ्ट वरच्या मजल्यावर थांबते.
advertisement
दिल देहलदेने वाला वलसाड का यह वीडियो लिफ्ट के रखरखाव की कमी को उजागर करता है। दरअसल, गुजरात की कई पुरानी सोसायटीज में खस्ता हाल में ही लिफ्ट चल रही है। जो कभी भी मौत को बुलावा दे सकती है। @sanghaviharsh pic.twitter.com/T5vK4tBuhq
— Dixit Soni (@DixitGujarat) March 3, 2026
advertisement
वलसाडमधील तीथल रोडवरील मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधलेल्या सरदार हाइट्स इमारतीत ही घटना घडली. याबद्दल माहिती देताना सोसायटीच्या अध्यक्षांनी माध्यमांना सांगितले की, इमारतीत एकूण 14 मजले आहेत, ज्यासाठी एक हाय-टेक लिफ्ट बसवण्यात आली आहे. त्याची देखभाल ओमेगा कंपनी करते. दोन दिवसांपूर्वी ओमेगा कंपनीचे लोक या लिफ्टमधील लाईट आणि पंख्यांमधील समस्या दूर करण्यासाठी आले आणि ती दुरुस्त केली. आज अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. त्यांनी सांगितले की, लिफ्टचा दरवाजा उघडा असतानाही लिफ्ट चालू लागली.
Location :
Valsad,Gujarat
First Published :
Mar 03, 2026 10:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
लिफ्ट उघडताच पायाखालची जमीन सरकली, 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, थरकाप उडवणारा Video








