फक्त 5 रुपयांसाठी महिलेला स्वच्छतागृहावर अडवलं, कपड्यातच.., बदलापूर स्थानकावरील संतापजनक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
बदलापूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर स्वच्छतागृह आहे. एक प्रवासी महिला स्वच्छतागृहात गेली होती. पण,
बदलापूर : एकीकडे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची वाढलेली गर्दी आणि नेहमी चुकलेलं वेळापत्रक यामुळे मध्य रेल्वेच्याा सेवेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृहावर नेहमी प्रवाशी आणि ठेकेदारााच्या कर्मचाऱ्यांच्यासोबत वाद घालण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. अशातच बदलापूर स्थानकावरून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेली स्वच्छतागृहावर अडवण्याात आलं. त्यामुळे या महिलेला कपड्याात लघुशंका करण्याची वेळ आली, या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी बदलापूर स्थानकावर आंदोलन केलं.
मुंबई आणि उपनगरांमध्ये महिलांना स्वच्छतागृहांसाठी कायम झगडावं लागत आहे. एकीकडे मेट्रो आणि मोनो रेल धावत आहे, पण अजूनही लोकल स्टेशनवर नीट स्वच्छतागृहांची सोय नाही. बदलापूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर स्वच्छतागृह आहे. एक प्रवासी महिला स्वच्छतागृहात गेली होती. पण, या महिलेकडे ५०० रुपये होते, त्यामुळे सुट्टे ५ रुपये देण्याची अडचण निर्माण झाली. या महिलेनं विनंती केली, पण या महिलेला पुढे जाऊ दिलं नाही. त्यामुळे या महिलेला कपड्यात लघुशंका झाली, स्वच्छतागृहावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
ही माहिती कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना समजली. त्यानंतर म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह बदलापूर स्थानकावर पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. या स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार म्हात्रे यांनी रेल्वे पोलिसांचं कार्यालय गाठलं आणि ठिय्याा आंदोलन केलं. तब्बल ३ तास आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
advertisement
स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. धक्कादायक म्हणजे, या स्वच्छतागृहामध्ये ५ रुपये हे बेकाायदेशीर पद्धतीने मागितले जात असल्याचंही समोर आलं आहे. त्याामुळे स्वच्छतागृह चालवणारी महिला प्रवाशांकडून पैसे का स्विकारत होते, हे मात्र अद्याप समोर येऊ शकलं नाही. या घटनेमुळे प्रवाशी संघटनेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Location :
Badlapur,Thane,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 10:42 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
फक्त 5 रुपयांसाठी महिलेला स्वच्छतागृहावर अडवलं, कपड्यातच.., बदलापूर स्थानकावरील संतापजनक घटना








