advertisement

Iran Israel War : इराण-इस्त्राइल युद्धामुळे नांदेडमध्ये अफवा पसरली अन् लोकांनी बाईकच्या टाक्या केल्या फुल्ल, पण...

Last Updated:

आज होळीमुळे संध्याकाळपर्यंत काही पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे अफवेला बळ मिळालं आणि बघता बघता पेट्रोल पंपावर एकच गर्दी उसळली.

News18
News18
नांदेड : अमेरिका, इस्त्राइल आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. संपूर्ण जगाला सर्वाधिक इंधन पुरवणाऱ्या इराणवर दोन्ही देशांनी हल्लाा केल्यामुळे जगभरासह भारतात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. भारतातही पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण होईल, असं बोललं जात आहे. पण,जगभरात कुठेही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, नांदेडमध्ये एका अफवेमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.  युद्धामुळे पेट्रोल महागणार, तीन दिवस पेट्रोल पंप बंद रहाणार असल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली. त्यामुळे नांदेडच्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी  एकच गर्दी केली आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतील पेट्रोल विक्रीवर होणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरली, त्यानंतर नांदेडमध्ये मंगळवारी रात्री पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी अचानक एकच गर्दी केली. शहारातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहन धारकांची गर्दी झाली. जिकडे तिकडे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या.
होळीमुळे पेट्रोल पंप बंद आणि अफवा पिकली
आज होळीमुळे संध्याकाळपर्यंत काही पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे अफवेला बळ मिळालं आणि बघता बघता पेट्रोल पंपावर एकच गर्दी उसळली. तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी देखील अफवा पसरली. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. आता तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी टँक फुल देखील केले होते.
advertisement
मुबलक पेट्रोल साठा उपलब्ध
दरम्यान, मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर जिकडे तिकडे गर्दी झाल्यामुळे खळबळ उडाली. अखेरीस, 'पेट्रोल पंप बंद होणार नाही, मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोल पंप चालकाने दिली.  शिवाय केंद्र शासन किंवा प्रशासनाकडून पेट्रोल महागणार किंवा पुरवठा कमी होणार अशी कुठलीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही, असंही सांगण्यात आलं.  त्यामुळे निव्वळ अफवेमुळे नागरिकांनी सगळीकडे पेट्रोल पंपांवर गर्दी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Iran Israel War : इराण-इस्त्राइल युद्धामुळे नांदेडमध्ये अफवा पसरली अन् लोकांनी बाईकच्या टाक्या केल्या फुल्ल, पण...
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement