TRENDING:

APMC Market : शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कृषी मालाची आवक झाली. राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कृषी मालाची आवक झाली. राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, लिंबू आणि शेवग्याची आवक आणि भाव पाहूयात.
advertisement

आल्याच्या दरात सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 176 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 160 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 13 क्विंटल आल्यास 3750 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert: कोकणात वारं फिरलं, बुधवारी येणार संकट; 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

advertisement

लिंबूची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 39 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी कोल्हापूर बाजारात आवक झालेल्या 32 क्विंटल लिंबूस 5000 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल लिंबूस प्रतीनुसार 3500 ते 9000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

शेवग्यास उठाव 

advertisement

आज राज्याच्या मार्केटमध्ये 38 क्विंटल शेवग्याची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 20 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास 5750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल