Kolapur: हे कोल्हापुरातचं घडू शकतं! लहान पोरांचा 'टोलनाका', येणाऱ्या जाणाऱ्यांकडून चिल्लर करता गोळा, लोकही देतात!
- Published by:Sachin S
Last Updated:
राज्यभरात होळी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कुठे पंरपरा जपत गाढवावरून जावायची धिंड काढली तर कुठे घरातील सदस्याला काठीने मारहाण अशी परंपरागत होळी साजरी झाली. पण, कोल्हापूरमध्ये बच्चेकंपनीची वेगळीच परंपरा समोर आली आहे.
advertisement
1/6

राज्यभरात होळी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कुठे पंरपरा जपत गाढवावरून जावायची धिंड काढली तर कुठे घरातील सदस्याला काठीने मारहाण अशी परंपरागत होळी साजरी झाली. पण, कोल्हापूरमध्ये बच्चेकंपनीची वेगळीच परंपरा समोर आली आहे. दरवर्षी धुळीवंदनाला ही बच्चे कंपनी लोकांकडून चिल्लर गोळा करते.
advertisement
2/6
कोल्हापूर जिल्ह्यातील रजपूतवाडी, पोर्ले तर्फ ठाणे भागामध्ये बच्चे कंपनीकडून ही अनोखी प्रथा आणि परंपरा जपली जात आहे. गावातील रस्त्यावर टोलनाका उभारून लोकांकडून पैसे गोळा केले जातात.
advertisement
3/6
धुलीवंदनाच्या दिवशी गावातील पोरं रस्त्यावर उतरता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडवतात आणि त्यांच्याकडे 'धूलवडीचा कर' म्हणून पैसे मागतात, ही रक्कम फार काही मोठी नसते, अगदी किरकोळ असते. पण बच्चे कंपनी एकच कल्ला करते, त्याामुळे वाहनचालक पैसे देऊन निघून जातात.
advertisement
4/6
पोरं दिवसभर हा कार्यक्रम राबवतात. दुपारी होळी संपल्यानंतर चिल्लर पैसे किती गोळाा झाले याची मोजणी करतात, या पैशातून पोर खाऊची पार्टी करतात किंवा कुठे जेवायला जातात.
advertisement
5/6
विशेष म्हणजे, दरवर्षी पोरं मोठ्या उत्साहाने ही परंपरा पाळत आाले आहे. कोल्हापूरकरही लेकरांचा नाद म्हणून पैसे देतात, यंदा मात्र पोरं QR कोड घेऊन पैसे गोळा करताना आढळली.
advertisement
6/6
दरवर्षी पोरांचा हा हट्ट असतो, धुळीवंदनाला रस्त्याावर वाहनधारकांना अडवून पैसे मागायचे, कोल्हापूरकरही पोरांना नाही म्हणत नाही, होळीमधलं कोल्हापूरमधलं हे एक वेगळेपण यंदाही जपलं गेलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Kolapur: हे कोल्हापुरातचं घडू शकतं! लहान पोरांचा 'टोलनाका', येणाऱ्या जाणाऱ्यांकडून चिल्लर करता गोळा, लोकही देतात!