TRENDING:

संभाजीनगरात गोडाऊनला भीषण आग, काही क्षणांतच आगीचं रौद्ररूप, आगीचे भयंकर फोटो

Last Updated:
मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊन लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
1/5
संभाजीनगरात गोडाऊनला भीषण आग, काही क्षणांतच आगीचं रौद्ररूप, आगीचे भयंकर फोटो
छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात असलेल्या मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे.
advertisement
2/5
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
3/5
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
4/5
धुराचे मोठमोठे लोट आकाशात पसरताना दिसत आहेत. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
advertisement
5/5
मात्र गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाल्यानंतरच नेमके कारण आणि नुकसानाचा अंदाज स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
संभाजीनगरात गोडाऊनला भीषण आग, काही क्षणांतच आगीचं रौद्ररूप, आगीचे भयंकर फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल