T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया मुंबईमध्ये, पण... चंद्रग्रहण सुरू होताच काय केलं? वानखेडेवरून मोठी अपडेट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. गुरूवार 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर ही हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार टीम पोहोचल्या आहेत. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे, तर भारताची लढत इंग्लंडविरुद्ध होईल.
advertisement
2/8
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये पहिली सेमी फायनल होईल, तर गुरूवार 5 मार्चला भारत आणि इंग्लंड मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये खेळतील. या दोन सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भिडतील.
advertisement
3/8
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मधल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि सेमी फायनलमध्ये धडक मारली. रविवारी कोलकात्यामध्ये हा सामना झाल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
advertisement
4/8
इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलसाठी टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनला आजपासून सुरूवात होणार होती, पण भारतीय टीमने दुपारच्या सत्रामध्ये होणारा सराव टाळला आहे.
advertisement
5/8
टीम इंडिया संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खग्रास चंद्रग्रहणामुळे टीम इंडियाने सराव टाळल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
6/8
खग्रास चंद्रग्रहणाला दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरूवात झाली असून ग्रहण संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी संपणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक काळ पाळला जाणार आहे, त्यामुळे टीम इंडियाने सराव केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
7/8
ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर फ्लड लाईट्समध्ये नेट प्रॅक्टिसला सुरूवात करेल.
advertisement
8/8
सेमी फायनलसाठी भारत आणि इंग्लंड यांचा सराव दुपारपासून सुरू होणार होता. इंग्लंडने मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांच्या सरावाला सुरूवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया मुंबईमध्ये, पण... चंद्रग्रहण सुरू होताच काय केलं? वानखेडेवरून मोठी अपडेट!