TRENDING:

डोंबिवलीतून ठाणे अवघ्या 20 रुपयांत, KDMT ची खास बससेवा, पाहा थांबे आणि वेळापत्रक

Last Updated:
Dombivli News: डोंबिवलीतून ठाणे अवघ्या 20 रुपयांत आरामदायी प्रवास करता येणार आहे. केडीएमटीच्या नव्या बसचं वेळापत्रक आणि थांब्याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
डोंबिवलीतून ठाणे अवघ्या 20 रुपयांत, KDMT ची खास बससेवा, पाहा थांबे आणि वेळापत्रक
डोंबिवली-ठाणे प्रवाशांची संख्या मोठी असून बऱ्याचदा लोकलच्या गर्दीत लोंबकळतच प्रवास करावा लागतो. परंतु, आता हा प्रवास सोपा आणि आरामदायी होणार आहे. या मार्गावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहनने (केडीएमटी) खास बससेवा सुरू केली असून अवघ्या 20 रुपयांत डोंबिवलीतून ठाण्याला जाता येणार आहे.
advertisement
2/7
डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवी बस धावणार आहे. या बस सेवा उपक्रमात रोज 40 फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत दर तासाला एक फेरी होणार आहे. एका फेरीसाठी साधारण 55 मिनिटे लागतात.
advertisement
3/7
स्वामीनारायण सिटी येथून पहिली बस सकाळी 7. 15 आणि शेवटची बस सायंकाळी 6.45 वाजता सुटेल. या बसचा ठाण्यातील माजिवडा जंक्शन येथे शेवटचा थांबा असेल. माजिवडा जंक्शन येथून स्वामीनारायण सिटीला पहिली बस सकाळी 8.15 आणि शेवटची बस सायंकाळी 8.15 वाजता सुटेल.
advertisement
4/7
डोंबिवली ते ठाणे बस प्रवास अवघ्या 20 रुपयांत होणार आहे. या मार्गावर किमान भाडे 5 रुपये आणि कमाल भाडे 20 रुपयांपर्यंत असणार आहे. तर या 82 क्रमांकाच्या मार्गावर एकूण 15 पेक्षा जास्त थांबे आहेत.
advertisement
5/7
डोंबिवली पश्चिमेकडून मानकोली उड्डाणपुलाद्वारे ठाण्याला जोडतो. डोंबिवली विभागात मोठागाव सर्कल, स्वामीनारायण सिटी (सुरुवात), शास्त्रीनगर रुग्णालय, रामेश्वर दर्शन, भवानी माता मंदिर, कोपर (शिवसेना शाखा), विराट हाईट, म्हाळसादेवी मंदिर, मोठागाव पाण्याची टाकी हे थांबे असतील.
advertisement
6/7
हायवे व ठाणे विभागात मानकोली, लोढा (अप्पर ठाणे), अंजूर दिवे, खारीगाव, रुस्तमजी, माजिवाडा जंक्शन येथे शेवटचा थांबा असेल.
advertisement
7/7
दरम्यान, डोंबिवली ते ठाणे दरम्यानच्या लोकलला सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे प्रवाशांच्या अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. आता या बससेवेमुळे स्वस्तात आणि आरामदायी प्रवास होणार आहे. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून गर्दीनुसार वेळेत बदल होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
डोंबिवलीतून ठाणे अवघ्या 20 रुपयांत, KDMT ची खास बससेवा, पाहा थांबे आणि वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल