Kitchen Hacks : प्लास्टिकच्या डब्यांना मसाल्याचे हात लागलेत? 'या' ट्रिक्सने साफ करा, कसलाही डाग सहज निघेल
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to clean deep stains from plastic containers : स्वयंपाकघरात काम करताना बऱ्याचदा आपले खरकटे हात डब्यांना लागतात. त्यातही डबे प्लास्टिकचे असतील तर त्यावरचे डाग लवकर पक्के होण्याची शक्यता असते. म्हणूनच ते लावर साफ करणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला यासाठीच एकही सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
1/7

प्लास्टिकच्या डब्यांवर पडलेले खरकट्या हातांचे डाग किंवा मसाल्यांचे डाग लवकर काढले नाहुत तर ते त्यांच्या खुणा डब्यावर सोडून जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा युक्त्या सांगणार आहोत. ज्याने हे डाग पूर्णपणे डब्यावरून निघतील.
advertisement
2/7
डब्यावरील डाग काढण्यासाठी व्हिनेगरदेखील खूप उत्तम काम करते. यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा पांढरा व्हिनेगर मिसळा आणि कंटेनर किमान एक तास त्यात भिजवा. डाग जास्त असेल तर रात्रभर ठेवा आणि नंतर कंटेनर स्वच्छ धुवा.
advertisement
3/7
प्लास्टिकच्या डब्यांवरील डाळी आणि भाज्यांचे डाग काढण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता. यासाठी कंटेनरमध्ये गरम पाणी आणि थोडे डिशवॉशिंग लिक्विड घाला. यामध्ये टिशू पेपरचे तुकडे घालून झाकण बंद करा आणि जोरात हलवा. काही वेळातच डाग निघतील. नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि वाळवा.
advertisement
4/7
सर्वात आधी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. हा प्लास्टिकच्या डबीवरील चिकट तेल आणि मसाल्यांचे डाग काढून टाकेल. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळा आणि कंटेनरवर लावा. 15 ते 20 मिनिटानंतर ब्रश किंवा स्क्रबने हलके घासून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डाग निघतील.
advertisement
5/7
तुम्ही गरम पाणी आणि डिटर्जंटचा वापर करूनही डाग काढू शकता. गरम पाणी आणि डिटर्जंट एकत्र करा. त्यात कंटेनर थोडा वेळ भिजवा. यामुळे घाण मऊ होईल. नंतर घासणीने ती घासल्यावर सहज निघेल.
advertisement
6/7
सोड्याप्रमाणेच लिंबूदेखील घरातील साफसफाईसाठी बेस्ट आहे. कंटेनरवरचे हळदीचे पिवळे डाग काढण्यासाठी 2-3 लिंबाचा रस एक बादली कोमट पाण्यात घाला. प्लास्टिकचे कंटेनर या पाण्यात एक ते दीड तास भिजवा आणि नंतर साबणाने घासून धुवा. यांने पिवळेपणा खूप कमी होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : प्लास्टिकच्या डब्यांना मसाल्याचे हात लागलेत? 'या' ट्रिक्सने साफ करा, कसलाही डाग सहज निघेल