'या' आहेत देशातील 10 सर्वात बेस्ट Electric Car! जाणून घ्या किंमती, फीचर्ससह रेंज डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतात इलेक्ट्रिक कार्सची डिमांड ही वेगाने वाढत आहेत. मार्केटमध्ये 7.5 लाखांपासून तर 20 लाख रुपयांहून जास्तपर्यंत अनेक शानदार ईव्ही उपलब्ध आहेत. टाटा नेक्सॉन EV पासून महिंद्रा BE 6 आणि नवीन मारुती e Vitara पर्यंत कोणती कार सर्वात जास्त रेंज आणि फीचर्स देते पाहूया. खरेदीपूर्वी चेक करा पूर्ण लिस्ट...
advertisement
1/10

टाटा नेक्सॉन ईव्ही : सेलच्या बाबतीत ही भारताची नंबर 1 इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत 12.49 लाखांपासून सुरु होते आणि ARAI रेंज 489 किमीपर्यंत आहे. शानदार डिझाइन, पॉवरफूल मोटर, लेव्हल-2 ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 5-स्टार सेफ्टीसह ही फॅमिलीसाठी बेस्ट चॉइस आहे. शहर असो किंवा हायबे, नेक्सॉन ईव्ही प्रत्येक ठिकाणी विश्वासार्ह ठरते.
advertisement
2/10
एमजी विंडसर ईव्ही : ही स्टाइल आणि स्पेसचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. याची किंमत जवळपास 14 लाखांपासून सुरु होते आणि रेंज 449 किमीपर्यंत आहे. मोठं केबिन, प्रीमियम इंटीरियर, इंफिनिटी साउंड सिस्टम आणि फास्ट चार्जिंगसह ती व्हॅल्यू फॉर मनी आहे. आरामदायर असण्यासोबतच मॉडर्न लूकची ही कार तरुण आणि फॅमिली दोन्हींची पसंत ठरतेय.
advertisement
3/10
टाटा पंच ईव्ही : ही कॉम्पॅक्ट मात्र पॉवरफूल आहे. याची किंमत फक्त 9.69 लाखांपासून सुरु होते आणि रेंज 468 किमीपर्यंत आहे. लहान साइजमध्ये मोठी रेंज, हाय ग्राउंड क्लियरेन्स आणि मजेदार ड्रायव्हिंग याला बेस्ट बनवते. शहरांच्या गल्ल्यांपासून किरकोळ ऑफ-रोडिंगपर्यंत परफेक्ट आहे. बजेटमध्ये बेस्ट ईव्ही हवी असेल तर तुम्ही ही कार खरेदी करु शकता.
advertisement
4/10
महिंद्रा BE6: ही सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात फ्यूचरिस्टिक डिझाइन केलेल्या EV पैकी एक आहे. किंमती 18.90 लाख पासून सुरू होतात आणि 680 किमी पर्यंतची रेंज देतात. बॉर्न EV प्लॅटफॉर्मवर बनवलेली ही SUV कामगिरी, लक्झरी आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. तिची आकर्षक लाटटिंग, मोठी टचस्क्रीन आणि प्रीमियम फील तिला यूनिक बनवते. प्रीमियम EV सेगमेंटमध्ये ती एक नवीन स्टँडर्ड सेट करत आहे.
advertisement
5/10
टाटा कर्व्ह ईव्ही : ही देशातील सर्वात अफोर्डेबल कूपे स्टाइल एसयूव्ही आहे. याची किंमत 17.49 लाखांपासून सुरु होते आणि रेंज 502 किमीपर्यंत आहे. बोल्ड लूक, स्पोर्टी हँडलिंग आणि प्रीमियम फीचर्ससह ती युवा खरेदीदारांची फेव्हरेट बनतेय. कम्फर्टेबल केबिन आणि चांगल्या परफॉर्मेंससह स्टाइल आणि सुविधेचं योग्य मिश्रण आहे.
advertisement
6/10
टाटा हॅरियर ईव्ही: ही एक प्रीमियम आणि स्पेशियस 5-सीटर ई-एसयूव्ही आहे. किंमत 21 लाखा रुपयांपासून सुरू होते. तिचा मोठा आकार, उत्कृष्ट श्रेणी, लक्झरी फीचर्स आणि टाटाची मजबूत बिल्ड क्वालिटी यामुळे ती अद्वितीय बनते. कुटुंबांसाठी आदर्श, लांब ड्राइव्ह आणि हायवे राईड्ससाठी आरामदायी. प्रीमियम ईव्ही एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
7/10
महिंद्रा XEV 9e: सध्याच्या काळात महिंद्राची प्रीमियम ऑफरिंग आहे. याची किंमत 21.90 लाखांपासून सुरु होते. अडव्हान्स टेक्नॉलॉजी, मोठी रेंज आणि लग्जरी इंटीरियरसह ही मॉडर्न डिझाइन आणि हाय परफॉर्मेंसची ईव्ही आहे. ही ईव्ही अशा लोकांसाठी आहे ज्यांना काही वेगळे आणि प्रीमियम हवे आहे.
advertisement
8/10
एमजी कॉमेट ईव्ही: शहरात गाडी चालवण्यासाठी परफेक्ट आहे. किंमत 7.5 लाखांपासून सुरू होते. कॉमेट ईव्ही चांगली रेंज आणि सोपी पार्किंग देते. तिचा कॉम्पॅक्ट आकार, क्यूट लूक, ड्युअल स्क्रीन आणि स्मार्ट फीचर्स यामुळे ती महिला आणि तरुण खरेदीदारांसाठी एक उत्तम ऑप्शन बनते. बजेट ईव्ही सेगमेंटमधील हा सर्वात स्टायलिश ऑप्शन आहे.
advertisement
9/10
टाटा टियागो ईव्ही : ही टाटाची एंट्री लेव्हल ईव्ही आहे. या कारची किंमत 7.99 लाखांपासून सुरु होते आणि रेंज 315 किमीपर्यंत जाते. परवडणारी, विश्वसनीय आणि ईजी टू ड्राइव्ह असण्यासोबतच ती पहिली ईव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी आयडियल आहे. चांगला परफॉर्मेंस आणि टाटाच्या सेफ्टीसह व्हॅल्यू पॅकच्या रुपात ती खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
10/10
मारुती सुझुकी ई विटारा : कंपनीची ही पहिली मास मार्केट ईव्ही आहे. या कारची किंमत 13.49 लाख रुपयांपासून सुरु होते आणि रेंज 546 KM पर्यंत जाते. मारुतीची पहिली मेनस्ट्रीम EV , विश्वसनीय सर्व्हिस नेटवर्क, चांगली रेंज आणि प्रॅक्टिकल डिझाइन या कारला बेस्ट बनवते. ही अशा लोकांसाठी परफेक्ट आहे. ज्यांना मारुतीचा विश्वास आणि ईव्हीचं फ्यूचर हवं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'या' आहेत देशातील 10 सर्वात बेस्ट Electric Car! जाणून घ्या किंमती, फीचर्ससह रेंज डिटेल्स