Friday OTT Release : प्रभासचा 'राजा साहब' ते 'गांधी टॉक्स', शुक्रवारी 15 फिल्म-वेब सीरिजचा OTT वर धमाका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Friday OTT Release : मार्च महिन्याचा पहिला शुक्रवार आहे आणि या शुक्रवारी OTT वर धमाका होणार आहे. OTT वर 1-2 नाही तब्बल 15 वेब सीरिज आणि सिनेमे रिलीज होत आहेत. रोमांसपासून रिअॅलिस्टिक सोशल ड्रामापर्यंत, हॉररपासून क्राइम थ्रिलरपर्यंत प्रत्येक प्रेक्षकासाठी खास मेजवानी असणार आहे.
advertisement
1/8

चिरैया ( JioHotstar ) - दिव्या दत्ताचा 'चिरैया' हा सिनेमा रिलीज झाला आहे. वैवाहिक बलात्कार आणि सामाजिक मौन यांसारख्या संवेदनशील विषयांवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.
advertisement
2/8
जब खुली किताब ( Zee 5 ) - हा हिंदी रोमँटिक कॉमेडी-ड्रामा असलेला सिनेमा आहे. पंकज कपूर, डिंपल कपाडिया आणि अपारशक्ती खुराना प्रमुख भूमिकेत आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धातील प्रेम, साथ आणि माफी सिनेमात दाखवण्यात आली आहे.
advertisement
3/8
द राजा साब (हिंदी) ( JioHotstar ) - प्रभासचा मोस्ट अवटेड सिनेमा असून तो एका वारसाच्या भूमिकेत असून संजय दत्त हिप्नोटिक जादूगाराच्या भूमिकेत आहे. तर बोमन इराणी पॅरानॉर्मल एक्सपर्टच्या भूमिकेत आहे. 'टेड सीजन 2', साऊथ क्राइम थ्रिलर सिरीज 'विक्रम ऑन ड्यूटी' देखील JioHotstar वर रिलीज होणार आहे.
advertisement
4/8
गांधी टॉक्स ( Zee 5 ) - ही सायलेंट ब्लॅक कॉमेडी फिल्म आहे. विजय सेतुपती, अरविंद स्वामी आणि अदिती राव हैदरी प्रमुख भूमिकेत आहेत. लालच आणि भ्रष्टाचारावर आधारित कथा आहे.
advertisement
5/8
ग्रॅनी ( SUN NXT ) - ही सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर फिल्म आहे आहे. एका रहस्यमय वृद्ध महिलेभोवती सिनेमाची कथा फिरते. त्याचबरोबर 'डियर राधी' ही कॉमेडी-ड्रामा रोमांस फिल्म. 'धीरम' ही थ्रिलर फिल्म देखील रिलीज होणार आहे.
advertisement
6/8
लालो: कृष्ण सदा सहायताते ( Sony Liv ) - हा गुजराती स्पिरिच्युअल ड्रामा आहे. आत्मशोधाच्या प्रवासाची कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.
advertisement
7/8
'द डायनासोर्स' ही 4 भागांची नेचर डॉक्युमेंटरी सिरीज आहे. सायन्स-फिक्शन मिलिटरी अ‍ॅक्शन थ्रिलर 'वॉर मशीन', 'बॉयफ्रेंड ऑन डिमांड' ही रोमँटिक थ्रीलर सिरीज, हेलो बच्चों या सीरिज Netflix वर रिलीज होणार आहे.
advertisement
8/8
'किस ऑफ द स्पायडर वुमन' ही जेलमध्ये दोन कैद्यांमधील नात्यावर आधारित कथा. लायन्सगेट प्लेवर रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday OTT Release : प्रभासचा 'राजा साहब' ते 'गांधी टॉक्स', शुक्रवारी 15 फिल्म-वेब सीरिजचा OTT वर धमाका