रिसेप्शनच्या ठिकाणी सेलिब्रिटींची ये-जा सुरू असताना, एक तरुण अतिशय सभ्य आणि डिसेंट कपडे घालून पाहुण्यांच्या गर्दीत मिसळला. त्याने असा गेटअप केला होता की कोणालाही संशय येऊ नये की तो निमंत्रित नाही. पण रिसेप्शनच्या गेटवर तैनात असलेल्या कडक बाउन्सर्सनी त्याचा चेहरा वाचला आणि तो या सोहळ्याचा अधिकृत पाहुणा नसल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं.
advertisement
बायकोला मारहाण, आईवडिलांवर खोटी केस; 'UK07 रायडर'च्या आरोपांवर भावाचा पलटवार, केली युट्यूबरची पोलखोल
बाउन्सर्सने धक्के मारून काढलं बाहेर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा तरुण बाउन्सर्सना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण बाउन्सर्सनी त्याचं काहीही न ऐकता त्याला चक्क उचलून गेटच्या बाहेर काढलं. एका क्षणात त्या तरुणाचा प्लॅन फसला आणि त्याला तिथून काढता पाय घ्यावा लागला. सध्या या तरुणाचा हा फजितीचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
दिग्गजांची हजेरी अन् 'हिंदी-साउथ'चा मिलाफ
या रिसेप्शनला केवळ साउथच नाही तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील बड्या नावांनीही हजेरी लावली होती. एका बाजूला महेश बाबू, अल्लू अर्जुन, राम चरण, नागार्जुन आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या कुटुंबासह विरोशला आशीर्वाद दिले. तर दुसरीकडे बॉलिवूडमधून करण जोहर, कृती सेनन, नीना गुप्ता, मृणाल ठाकूर आणि रिया चक्रवर्ती यांनीही सोहळ्याची शोभा वाढवली.
