TRENDING:

T20 World Cup : राशीद खानची हकालपट्टी, रोहित-विराटला चँलेज देणारा बनला अफगाणिस्तानचा नवा कॅप्टन

Last Updated:
टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरा फायनलीस्ट कोण ठरतो? याची उत्सुकता असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/8
राशीद खानची हकालपट्टी, रोहित-विराटला चँलेज देणारा बनला अफगाणिस्तानचा नवा कॅप्टन
टी20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आणि कालच बुधवारी न्यूझीलंडच्या रूपात वर्ल्डकपला पहिला फायनलीस्ट मिळाला होता.
advertisement
2/8
आज वानखेडेच्या मैदानावर इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलला पोहोचणार आहे.
advertisement
3/8
त्यामुळे दुसरा फायनलीस्ट कोण ठरतो? याची उत्सुकता असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
4/8
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टी20 कॅप्टन पदावरून मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने राशीद खानची टी20 कॅप्टन पदावरूम हकालपट्टी केली आहे.
advertisement
5/8
आता राशीद खानच्या जागी ईब्राहीम जादरानची टी20 कॅप्टन पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे ईब्राहीम जादरान श्रीलंका दौऱ्यावर अफगाणिस्तानच्या टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसला आहे.
advertisement
6/8
राशीद खानचा नेतृत्वात अफगाणिस्तान टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन उंची गाठली होती. दरम्यान 2024 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने सेमी फायनल गाठून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. पण 2026 च्या हंगामात अफगाणिस्तानने सगळ्यांचा निराशा केली कारण ग्रुप स्टेजमध्ये त्याचे आव्हान संपु्ष्ठात आलं होतं.
advertisement
7/8
आगामी टी20 सीरीजमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. आणि नवीन कर्णधारच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान टीमने आणखी उंची गाठावी अशी अपेक्षा केली जात आहे.
advertisement
8/8
तसेच ईब्राहीम जादरान हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी आव्हान यासाठी आहे कारण आयसीसीच्या वनडे बॅटींग रॅकींगमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. याच क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : राशीद खानची हकालपट्टी, रोहित-विराटला चँलेज देणारा बनला अफगाणिस्तानचा नवा कॅप्टन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल