TRENDING:

Wheat Farming: पेरायचं अन् थेट काढणीला जायचं, सांगलीत नुसत्या हवेवर होते गव्हाची शेती, पाहा कशी?

Last Updated:
Wheat Farming: खानापूरच्या घाटभागात हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारेच या खास गव्हाची शेती केली जाते.
advertisement
1/7
पेरायचं अन् थेट काढणीला जायचं, सांगलीत नुसत्या हवेवर होते गव्हाची शेती, पाहा कशी
रब्बी हंगामातील महत्त्वाचं तृणधान्य म्हणून गव्हाची शेती केली जाते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे गव्हाचे अनेक वाण उपलब्ध आहेत. परंतु, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील भागात चक्क हवेवर गहू पिकवला जातो. विशेष म्हणजे या गहू शेतीला पाणी आणि खतही दिलं जात नाही. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
2/7
खानापूरच्या घाटभागात हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारेच या खास गव्हाची शेती केली जाते. या भागात या पाण्याशिवाय पिकणाऱ्या गव्हाला शेतगहू किंवा हवेवरचा गहू म्हणून ओळखतात.
advertisement
3/7
या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. एकदा पेरला की थेट काढायलाच जायचं. याला पाणी आणि खत लागत नाही, असं स्थानक शेतकरी सांगतात.
advertisement
4/7
हवेवरच्या गव्हाला मध्यम स्वरूपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे आणि थंडगार असावे लागते. या दोन्ही गोष्टी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील रेणावी, रेवणगाव, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी आदी गावांमध्ये आहेत. त्यामुळे आठ-दहा गावांच्या शिवारात या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात.
advertisement
5/7
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजे दसरा झाली की या गव्हाची पेरणी होते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यांत हे पीक येतं. रब्बी हंगामात केवळ जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू असून त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. पेरणीसाठी एकरी 20 किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यातून एकरी 6 ते 7 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघते.
advertisement
6/7
गव्हाचे हे वाण दुर्मीळ असल्यामुळे सध्या काही शेतकऱ्यांकडेच उपलब्ध आहे. 8 ते 10 गावांत मिळून सुमारे 1500 एकरांत या गव्हाची शेती केली जाते. ‘हवेवरचा गहू’ इतर सर्व गव्हांच्या वाणापेक्षा वेगळा असतो. त्याचा बाजारभाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत एक हजार रुपये जास्तच असतो. त्याच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या असतात.
advertisement
7/7
या गव्हाला स्थानिक नाव शेतगहू असेही आहे. याच नावाने इथल्या लोकांनी या हवेवरच्या गव्हाच्या प्रजाती जपल्या आणि वाढवल्या आहेत. परंतु, अधुनिक शेतीच्या ओघात शेतगव्हाचं हे वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे पारंपरिक शेतगव्हाचं वाण संवर्धित होऊन त्यावर संशोधन व्हावं, असं स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Wheat Farming: पेरायचं अन् थेट काढणीला जायचं, सांगलीत नुसत्या हवेवर होते गव्हाची शेती, पाहा कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल