TRENDING:

होलिका दहनाला प्रदक्षिणा घालताना चुकूनही करू नका 'या' चुका, काय करावं आणि टाळावं आत्ताच वाचा!

Last Updated:
होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आज देशभरात होलिका दहन मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. मात्र होळीची प्रदक्षिणा करताना अनेक जण चुका करतात. ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
advertisement
1/7
होलिका दहनाला प्रदक्षिणा घालताना चुकूनही करू नका 'या' चुका, काय करावं आणि टाळावं
होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आज देशभरात होलिका दहन मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. मात्र होळीची प्रदक्षिणा करताना अनेक जण चुका करतात. ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. शास्त्रांनुसार, प्रदक्षिणेचे काही विशिष्ट नियम आणि सावधानता पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
2/7
प्रदक्षिणेची संख्या: होलिका दहनानंतर अग्नीला प्रदक्षिणा घालताना त्याची संख्या नेहमी विषम असावी. शास्त्रानुसार, किमान 3, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. प्रदक्षिणा घालताना 'नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप केल्यास घरावरील संकटे दूर होतात.
advertisement
3/7
पाण्याचे अर्पण आणि दिशा: प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूने सुरु करावी. प्रदक्षिणा घालताना हातातील तांब्यातून पाण्याची धार हळुवारपणे जमिनीवर सोडावी. यामुळे घराभोवती एक संरक्षक कवच तयार होते आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत.
advertisement
4/7
कोणासाठी प्रदक्षिणा वर्ज्य: पौराणिक मान्यतेनुसार, ज्या मातांना एकुलते एक आपत्य असते त्यांनी होलिका दहनाची प्रदक्षिणा करणे किंवा दहन पाहणे टाळावे. तसेच गर्भवती महिलांनीही अग्नीच्या तीव्र उष्णतेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी प्रदक्षिणा करू नयेत.
advertisement
5/7
अग्नीत कोणत्या वस्तू कराव्या अर्पण: प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर, पेटत्या होळीत नारळ, गव्हाच्या लोंब्या किंवा सुके खोबरे अर्पण करावे. मात्र, चुकूनही प्लास्टिक, चामड्याच्या वस्तू किंवा कचरा अग्नीत टाकू नका. यामुळे देवतेचा अनादर होतो आणि घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
6/7
शारीरिक अंतर आणि सुरक्षा: होलिका दहनाचा अग्नी अतिशय प्रबळ असतो. प्रदक्षिणा घालताना अग्नीपासून सुरक्षित अंतर राखावे. सुती कपडे परिधान करणे अधिक सुरक्षित ठरते. तसेच, प्रदक्षिणेच्या वेळी लहान मुलांना स्वतःपासून दूर ठेवू नका, त्यांचा हात धरूनच विधी पूर्ण करा.
advertisement
7/7
पाय अनवाणी असावेत: शक्य असल्यास होलिका दहनाची पूजा आणि प्रदक्षिणा अनवाणी पायाने करावी. जमिनीशी असलेला संपर्क आणि अग्नीची ऊब शरीरातील नकारात्मकता शोषून घेण्यास मदत करते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांत बसून अग्नीकडे पाहत आपल्या चुकांची क्षमा मागावी. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
होलिका दहनाला प्रदक्षिणा घालताना चुकूनही करू नका 'या' चुका, काय करावं आणि टाळावं आत्ताच वाचा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल