TRENDING:

उद्या पहिलं चंद्रग्रहण! आजच घरातून बाहेर काढा 'या' 6 वस्तू, अन्यथा वाढेल नेगेटिव्हिटी अन् होईल नुकसान

Last Updated:
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण धुलिवंदनच्या दिवशीच येत असल्याने आध्यात्मिक दृष्टीने त्याचे महत्त्व वाढले आहे.
advertisement
1/7
उद्या चंद्रग्रहण! घरातून बाहेर काढा 'या' 6 वस्तू, अन्यथा वाढेल नेगेटिव्हिटी
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण धुलिवंदनच्या दिवशीच येत असल्याने आध्यात्मिक दृष्टीने त्याचे महत्त्व वाढले आहे.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. या नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि घरामध्ये सुख-शांती टिकवण्यासाठी ग्रहणापूर्वीच घरातील काही ठराविक वस्तू काढून टाकणे किंवा त्यांची योग्य ठिकाणी व्हिलेवाट लावणे आवश्यक मानले जाते.
advertisement
3/7
शिळे अन्न आणि उघड्यावरील पदार्थ: ग्रहणाच्या काळात वातावरणात हानिकारक लहरी सक्रिय असतात, ज्याचा सर्वाधिक परिणाम अन्नपदार्थांवर होतो. त्यामुळे घरातील शिळे अन्न आजच संपवा किंवा टाकून द्या. जर काही महत्त्वाचे अन्नपदार्थ साठवून ठेवायचे असतील, तर त्यात तुळशीची पाने किंवा कुश अवश्य टाकून ठेवा.
advertisement
4/7
तुटलेली किंवा खंडित मूर्ती: वास्तूशास्त्रानुसार, घरात कोणत्याही देवतेची तुटलेली मूर्ती असणे अशुभ मानले जाते. ग्रहणापूर्वी अशा मूर्तींचे विसर्जन करावे. खंडित मूर्ती नकारात्मक ऊर्जा अधिक शोषून घेतात, ज्यामुळे घरातील प्रगती खुंटू शकते.
advertisement
5/7
बंद पडलेली घड्याळे: बंद पडलेले घड्याळ हे प्रगती थांबल्याचे प्रतीक मानले जाते. ग्रहणाच्या काळात अशा वस्तूंमुळे नकारात्मकतेचा प्रभाव दुप्पट होऊ शकतो. त्यामुळे जर घरात एखादे घड्याळ बंद असेल, तर ते आजच दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा.
advertisement
6/7
फाटलेले कपडे किंवा भंगार: घराच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेले जुने फाटलेले कपडे, तुटलेले फर्निचर किंवा भंगार सामानामुळे वास्तूदोष निर्माण होतो. ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घराची स्वच्छता करून अनावश्यक कचरा आजच फेकून द्यावा.
advertisement
7/7
धारदार वस्तू उघड्यावर ठेवू नका: शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी चाकू, कात्री किंवा सुई यांसारख्या धारदार वस्तू उघड्यावर ठेवणे किंवा वापरणे टाळावे. या वस्तू कपाटात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, जेणेकरून घरातील ऊर्जेवर त्यांचा विपरीत परिणाम होणार नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या पहिलं चंद्रग्रहण! आजच घरातून बाहेर काढा 'या' 6 वस्तू, अन्यथा वाढेल नेगेटिव्हिटी अन् होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल