TRENDING:

सगळीकडे धूरच-धूर, लोकांना श्वसनाचा त्रास, तोंडाला रुमाल लावून लोक पळाली, पालघरमध्ये धक्कादायक घटना, PHOTOS

Last Updated:
त्यामुळे कंपनीत सगळीकडे पांढरा धूर पसरला. बघता बघता सगळीकडे पांढऱ्या रंगाचा धूर पसरला. या धुरामुळे कर्मचाऱ्यांच्या श्वसनाचा त्रास होऊ लागला. (राहुल पाटील, प्रतिनिधी)
advertisement
1/11
सगळीकडे धूरच-धूर, लोकांना श्वसनाचा त्रास, तोंडाला रुमाल लावून लोक पळाली, PHOTOS
पालघरमधील बोईसर तारापूस एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा वायुगळतीची घटना घडली आहे. एका केमिकल कंपनीमध्ये अचानक ओलियम नावाच्या वायूची गळती झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट होते. त्यामुळे कर्मचारी आणि स्थानिकांची एकच पळापळ झाली. अनेकांना श्वसनाचा त्रास झाला आहे.
advertisement
2/11
त्यामुळे कंपनीत सगळीकडे पांढरा धूर पसरलाा. बघता बघता सगळीकडे पांढऱ्या रंगाचा धूर पसरला. या धुरामुळे कर्मचाऱ्यांच्या श्वसनाचा त्रास होऊ लागला.
advertisement
3/11
पालघरमधील बोईसर तारापूस एमआयडीसीमध्ये भगेरिया केमिकल कंपनी आहे. दुपारी २ वाजेच्या सुमारास गॅस गळतीची घटना घडली. काही कळायच्या आता अचानक गॅस लिक झाला. या कंपनीमध्ये तब्बल २० टन इतकी क्षमता असलेल्या ओलियम गॅसचा टँक लिकेज झाला.
advertisement
4/11
कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाली आहे. हा वायू वातावरणात पसरल्यामुळे कंपनीच्या परिसरात धुक्यासारखं वातावरण झालंय.
advertisement
5/11
त्यामुळे भगेरिया केमिकल कंपनी आणि शेजारच्या कंपन्यांमधील कामगारांनी बाहेर पळ काढला. तोंडाला रुमाला लावून शेकडो कर्मचारी मोकळ्या जागेकडे पळत निघाले.
advertisement
6/11
रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती. या परिसरात जाणाऱ्या वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. काही महिलांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे उलट्या झाल्या.
advertisement
7/11
घटनेची माहिती मिळता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
advertisement
8/11
नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणतीही घाईगडबड करू नये. कंपनीचे प्रतिनिधी तसंच संबंधित आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहे.
advertisement
9/11
या परिसरातील नागरिकांनी घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात. पंखे, एसी आणि इतर यंत्रणा तात्पुरत्या बंद ठेवाव्यात. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
advertisement
10/11
बाहेर पडताना नाक आणि तोंड ओल्या कापडाने झाकावे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केले आहे.
advertisement
11/11
दरम्यान, तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानंतर लियम गॅसच लिकेज प्रमाण काही प्रमाणात कमी झालं आहे. अग्निशमन दलाला लिकेज गॅसवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
सगळीकडे धूरच-धूर, लोकांना श्वसनाचा त्रास, तोंडाला रुमाल लावून लोक पळाली, पालघरमध्ये धक्कादायक घटना, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल