T20 World Cup : टीम इंडियाच्या 13 घोडचुका... सुधारण्याचा लास्ट चान्स, नाहीतर सेमी फायनललाच गेम ओव्हर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. सेमी फायनलमध्ये आता टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
advertisement
1/8

वेस्ट इंडिजने दिलेलं 196 रनचं आव्हान भारताने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. तसंच संजूची 97 रनची खेळी ही कोणत्याही टी-20 वर्ल्ड कपमधली भारतीय खेळाडूची सर्वोत्तम खेळी आहे.
advertisement
2/8
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने 6 मॅच खेळल्या, यातल्या 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला मोठ्या पराभवाचा धक्का बसला. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलला पोहचली असली तरी त्यांच्याकडून तब्बल 13 चुका झाल्या आहेत.
advertisement
3/8
इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये अशा चुका पुन्हा झाल्या, तर टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंग होऊ शकतं, त्यामुळे पुढच्या चार दिवसांमध्ये टीम इंडियाला या चुका सुधाराव्या लागणार आहे.
advertisement
4/8
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने तब्बल 13 कॅच सोडले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅच सोडणाऱ्यांमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने 11, दक्षिण आफ्रिकेने 10, पाकिस्तान-न्यूझीलंडने 8-8, वेस्ट इंडिज-झिम्बाब्वेने 7-7 आणि इंग्लंडने 6 कॅच सोडले.
advertisement
5/8
वेस्ट इंडिजविरुद्ध अभिषेक शर्मानेच 2 कॅच सोडले. यातला पहिला कॅच त्याने पाचव्या ओव्हरमध्ये रोस्टन चेससा सोडला. चेसने या सामन्यात 25 बॉलमध्ये 40 रन केले, त्यानंतर अभिषेकने 19व्या ओव्हरमध्ये रोव्हमन पॉवेलचाही कॅच सोडला.
advertisement
6/8
अभिषेकशिवाय तिलक वर्मानेही वेस्ट इंडिजविरुद्ध एक कॅच सोडला. शरफेन रदरफोर्डचा कॅच पकडत असताना तिलकचा अंदाज चुकला. बाऊंड्री लाईनवर उभं राहण्याच्या ऐवजी तिलक पुढे उभा राहिला आणि त्याच्या हातावरून बॉल गेला.
advertisement
7/8
पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यातही टीम इंडियाने चार कॅच ड्रॉप केले, यातही तिलक वर्माचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध वरुण चक्रवर्तीने एक सोपा रन आऊटही सोडला.
advertisement
8/8
टी. दिलीप हे सध्या भारतीय टीमचे फिल्डिंग कोच आहेत. सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला त्यांची फिल्डिंग सुधारावी लागणार आहे, या सामन्यात फिल्डिंगमधल्या चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाच्या 13 घोडचुका... सुधारण्याचा लास्ट चान्स, नाहीतर सेमी फायनललाच गेम ओव्हर!