TRENDING:

इराणी अभिनेत्रीचा भारतात 'कांड'! बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न; नंतर खळबळजनक सत्य समजलं

Last Updated:
Irani Actress : अमेरिका, इस्राइलने इराणवर हल्ला केला आहे, यादरम्यान भारतात येऊन बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न करणारी ही इराणी अभिनेत्री चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
इराणी अभिनेत्रीचा भारतात 'कांड'! बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न; नंतर शॉकिंग सत्य समोर
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि भयानक युद्ध परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान कित्येक भारतीय सेलिब्रिटीही चर्चेत आले आहेत. कुणी या हल्ल्याचा परिणाम झालेल्या दुबईत अडकलं तर कुणी आपण किती सुरक्षित आहोत याबाबत सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. पण आता चर्चेत आली आहे ती एक इराणी अभिनेत्री जी भारतात राहत होती आणि नंतर तिचं खळबळजनक सत्य समोर आलं होतं.
advertisement
2/7
एकेकाळी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे चर्चेत होती. एका क्लासिक हिंदी गाण्याच्या रिमेक म्युझिक व्हिडीओमध्येही ती दिसली आणि रातोरात ती भारतात फेमस झाली होती. पण नंतर ती वादात अडकली.
advertisement
3/7
या अभिनेत्रीचं नाव आहे नेगर खान. जिने क्लासिक हिंदी गाणं 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी'च्या रिमिक्स म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं होतं. तिच्या बोल्ड स्टाईल आणि स्क्रीन प्रेझेन्सने ती एका रात्रीत प्रसिद्ध झाली आणि ग्लॅमरच्या जगात तिची एंट्री चर्चेचा विषय बनली. तिने काही फिल्ममध्येही काम केलं आहे.
advertisement
4/7
पण फेब्रुवारी 2005 मध्ये ती एका मोठ्या वादात अडकली. ती बनावट कागदपत्रांसह वर्क व्हिसावर भारतात राहत असल्याचं उघड झालं. भारतात ती टुरिस्ट व्हिसावर काम करत होती. तिने बॉलिवूड अभिनेता साहिल खानशी लग्न केलं होतं. साहिलनेही नेगर त्यांच्या लग्नाच्या आधारावर भारतीय नागरिकत्वासाठी पात्र आहे, असा युक्तिवाद केला होता.
advertisement
5/7
तरी नेहर कायद्याच्या कचाट्यात अडकली आणि तिला भारत सोडावा लागला. त्यानंतर तिने नॉर्वेमध्ये तिच्या कारकिर्दीला पुढे नेलं. तिने नॉर्वेजियन रिअ‍ॅलिटी शो पॅराडाईज हॉटेलमध्ये भाग घेतला. पण तिथंही ती वादात अडकली.
advertisement
6/7
तिच्यावर अनेक प्लॅस्टिक सर्जरीचे आरोप झाले होते पण तिने ते फेटाळले. आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही हे तिने स्पष्टपणे सांगितलं. पण सोशल मीडियावरील तिचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले तर तिचा चेहरा खूपच बदललेला दिसतो. सध्या ती बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नाही.
advertisement
7/7
अभिनेता साहिला खानसोबतही तिचं नातं फार काळ टिकलं नाही. 2 वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. व्हिसा वाद आणि कायदेशीर कारवाई यामुळ दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटलं जातं. पण दोघांनी कधीही उघडपणे एकमेकांवर आरोप केले नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
इराणी अभिनेत्रीचा भारतात 'कांड'! बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न; नंतर खळबळजनक सत्य समजलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल