
कोकणातील शिमगा म्हणजे नुसता सण नाही तर तो एक मोठा लोकोत्सव असतो असं म्हणता येईल. मुंबईत असलेला चाकरमानी सुद्धा या दिवसांत ओढीनं आपल्या गावी जातो. कोकणातल्या शिमग्याचं वातावरण, संकासुराचा खेळ आणि पालख्यांचा नाच हे सगळं अनुभवणं म्हणजे एक पर्वणीच असते.कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. त्यातच आता कोकणातील चिपळून तालुक्यातील सावर्डे गावात होल्टा शिमग्याचा अनोखा प्रकार आहे. त्यात दोन गट एकमेकांवर पेटती लाकडं फेकतात. यात कुणालाही इजा होत नाही.