TRENDING:

Holi 2026 : दुर्गुणांचे प्रतिकात्मक दहन, ‎विद्यार्थ्यांनी पेटवली कचऱ्याची होळी, दिला अनोखा संदेश‎, Video

Last Updated:

विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबवली आणि जमा झालेल्या कचऱ्याची होळी पेटवत दुर्गुणांचे प्रतिकात्मक दहन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत होळी सण सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबवली आणि जमा झालेल्या कचऱ्याची होळी पेटवत दुर्गुणांचे प्रतिकात्मक दहन केले. स्वच्छ परिसर, निरोगी जीवन हा संदेश देत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देण्यात आला. सण साजरा करा, पण पर्यावरण जपा या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
advertisement

रासायनिक रंगांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्वचा, डोळे आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. फुलांच्या पाकळ्या, हळद, बेसन, पालक, कडुनिंब यांसारख्या घरगुती घटकांपासून सुरक्षित रंग कसे तयार करावेत, याची माहितीही देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांनी धुलिवंदन साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

याचबरोबर पाणी वाचवा – भविष्य वाचवा – भविष्य घडवा हा संदेश देत पाण्याचा अपव्यय टाळण्याची सामूहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. अंधश्रद्धा, व्यसन, स्वच्छतेचा अभाव, पर्यावरण प्रदूषण, मोबाईलचे व्यसन, भांडणतंटे आणि द्वेषभावना अशा दुर्गुणांचे फलक तयार करून त्यांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. चांगल्या सवयी अंगीकारूया, स्वच्छ आणि सुंदर गाव घडवूया, व्यसनमुक्त समाज निर्माण करूया अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

advertisement

Video: 33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये जगातील सर्वात मोठी संस्कृत डिक्शनरी!

‎शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उदे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, मनोज मस्के, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा, कल्याणी जगताप यांनी पुढाकार घेऊन यशस्वी आयोजन, अंमलबजावणी केली.

advertisement

पर्यावरणपूरक होळी, नैसर्गिक रंगांचा वापर आणि जलसंवर्धनाचा संदेश देत ढोरेगाव शाळेने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गरोदर महिलांना असाही मदतीचा हात, उचलला जातो वैद्यकीय खर्च, स्मितांचा उपक्रम
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Holi 2026 : दुर्गुणांचे प्रतिकात्मक दहन, ‎विद्यार्थ्यांनी पेटवली कचऱ्याची होळी, दिला अनोखा संदेश‎, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल