advertisement

विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: संबंधित महिलेला जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत असून, तिच्या आईलाही फोन करून “मुलीचे लग्न माझ्याशी लावा, अन्यथा तिला पळवून नेईन” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

Chhatrapati Sambhajinagar: विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
Chhatrapati Sambhajinagar: विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
‎छत्रपती संभाजीनगर : एक महिला मुलीसह झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास घरावर दगडफेक करून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारात एका 25 वर्षीय विधवा महिलेसह तिच्या लहान मुलीला किरकोळ दुखापत झाली. पुंडलिकनगर परिसरात 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. ओळखीच्या व्यक्तीकडून जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
‎28 फेब्रुवारी रोजी संबंधित महिला, तिची आई, भाऊ आणि लहान मुलगी घरात झोपलेले होते. अचानक अज्ञात व्यक्तीने घराच्या दिशेने लहान दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड कपाटाला लागून महिलेच्या आणि तिच्या मुलीच्या अंगावर आदळला. या घटनेत दोघींना किरकोळ मार लागला. आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले; मात्र बाहेर पाहणी केली असता कोणीही आढळून आले नाही.
advertisement
दरम्यान, खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने खिडकीतून हात घालून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात विजय भाऊसाहेब बिरारे (रा. त्रिमूर्ती चौक, जवाहरनगर) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दगडफेक आणि मोबाईल चोरीमागे त्याचाच हात असल्याचा संशय फिर्यादी महिलेने व्यक्त केला आहे.
advertisement
‎तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी संशयिताने महिलेच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच संबंधित महिलेला जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत असून, तिच्या आईलाही फोन करून “मुलीचे लग्न माझ्याशी लावा, अन्यथा तिला पळवून नेईन” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या सातत्याने सुरू असलेल्या धमक्यांमुळे महिला, तिची लहान मुलगी, आई आणि भाऊ यांच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे.‎
advertisement
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात विजय बिरारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार कसारे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement