Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोल भरताना ड्रायव्हरचा धक्कादायक मृत्यू, काही क्षणांत सगळं संपलं; पंपावर काय घडले?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, एका ड्रायव्हरचा दोन वाहनांमध्ये दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी घडली आहे. करमाड तालुक्यातील लाडगावमध्ये, एका ड्रायव्हरचा दोन वाहनांमध्ये दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. लाडगावातील भारत पेट्रोल पंपावर ही घटना घडली असून ट्रकमध्ये पेट्रोल भरत असताना ही घटना घडली आहे. आयशर ट्रकचा ड्रायव्हर पेट्रोल पंपावर ट्रकमध्ये पेट्रोल भरून घेत होता. पेट्रोल भरून घेतल्यानंतर ड्रायव्हर पेट्रोल पाहण्यासाठी गेला. त्यावेळी आपली ट्रक पुढे जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तितक्यात तो ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात ट्रक त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि पुढच्या ट्रकला जाऊन ती ट्रक धडकली.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. वैजापूर तालुक्यातील राहणाऱ्या 38 वर्षीय संदीप दशरथ मातकर, असं मृत ड्रायव्हरचं नाव आहे. संदीपकडे MH 17 CV 2227 या नंबरची आयशर ट्रक होती. संदीप मातकर लाडगावातील भारत पेट्रोलियम पंपावर आयशर ट्रकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभा होता. त्यांनी ट्रकमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोलची पाहणी करण्यासाठी खाली उतरला. तेवढ्यात ट्रक पुढे जात असल्याचं संदीपला आढळलं. तेवढ्यात त्याने ट्रकच्या केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या MH 17 BD 2227 या ट्रकला धडक बसली. या दोन्हीही ट्रकच्या धडकेमध्ये ड्रायव्हर अडकला होता. या धडकेमध्ये ड्रायव्हर गंभीर जखमी झाला होता.
advertisement
पण त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ट्रकच्या धडकेमध्ये ड्रायव्हरचा मृत्यू झाल्यामुळे वैजापूर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पेट्रोलपंपावर देण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे. याबद्दल आपल्याला कळते. दरम्यान, अनेकदा पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरत असताना मोबाईल वर बोलू नका किंवा वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, अशा अनेक नियमांची माहिती वाहन चालकांना दिली जाते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 5:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोल भरताना ड्रायव्हरचा धक्कादायक मृत्यू, काही क्षणांत सगळं संपलं; पंपावर काय घडले?







