advertisement

दुबईत अडकलेत 9 भारतीय सेलिब्रिटी; सर्वांचीच धाकधूक वाढली! Bigg Boss फेम प्रसिद्ध जोडप्याचाही समावेश

Last Updated:
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून सामान्य पर्यटकांसोबतच भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही एअरस्पेस बंद झाल्यामुळे अडकून पडले आहेत.
1/11
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून संपूर्ण जगाचे लक्ष मिडल ईस्टकडे लागले आहे. या युद्धाच्या वणव्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला गेलेले हजारो भारतीय तिथे अडकले आहेत.

2/11
यामध्ये सामान्य पर्यटकांसोबतच भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही एअरस्पेस बंद झाल्यामुळे अडकून पडले आहेत. घराकडे परतण्याची ओढ आणि युद्धाचे सावट अशा कात्रीत हे सेलिब्रिटी सापडले आहेत. युद्धाच्या या भीषण वातावरणात दुबईत नेमके कोणते कलाकार अडकले आहेत, पाहूया.

3/11
ईशा गुप्ता : बॉलीवूडची ही ग्लॅमरस अभिनेत्री सध्या दुबईत आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांना आपण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे, पण त्याचसोबत भारतीय सरकारला विनंती केली आहे की, तिथे अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी हालचाली कराव्यात.

4/11
अजित कुमार : तमिळ सुपरस्टार अजित कुमार दुबईत अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच दक्षिण भारतात खळबळ उडाली. मात्र, त्याच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे की, अजित सुरक्षित असून परिस्थिती निवळण्याची वाट पाहत आहे.

5/11
सोनल चौहान : 'जन्नत' फेम सोनल चौहानने थेट पंतप्रधान मोदींना टॅग करून आपल्याला आणि इतर भारतीयांना तिथून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. तिने युएई सरकारच्या मदतीचे कौतुकही केले आहे.

6/11
विष्णु मंचू : साऊथचा हा लोकप्रिय अभिनेता तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे, मात्र हवाई हल्ल्यांच्या धोक्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

7/11
एरिका फर्नांडिस : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री एरिका २०१३ पासून दुबईतच वास्तव्यास आहे. तिने एका पोर्टलला सांगितले की, ती सुरक्षित असली तरी तिथली परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात आहे.

8/11
रोहन गंडोत्रा : टीव्ही अभिनेता रोहन गंडोत्रा सोशल मीडियावरून तिथल्या विदारक परिस्थितीचे अपडेट्स शेअर करत चाहत्यांना सतर्क करत आहे.

9/11
कीथ सेक्वेरा आणि रोशेल राव: 'बिग बॉस' फेम हे जोडपे आपल्या चिमुकल्या मुलीसह दुबईत अडकले आहे. युएई प्रशासन सर्वांची काळजी घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

10/11
सुभाषश्री गांगुली: बंगाली अभिनेत्री सुभाषश्री आपल्या मुलासह तिथे आहे. तिचे पती राज चक्रवर्ती यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या सुरक्षिततेची पुष्टी केली आहे.

11/11
युएई प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे. यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, अनेक भारतीय सेलिब्रिटींनी हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले आहे. भारत सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement