advertisement

Mumbai: 5 मार्चला मुंबई थांबणार? टॅक्सी, कॅब, रिक्षा, खासगी बसचा संप? बैठकीतून मोठी अपडेट

Last Updated:

Mumbai Shutdown Updates: ई-चलन प्रणाली आणि इतर मागण्यांसाठी ५ मार्च २०२६ पासून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अ‍ॅक्शन कमिटी आणि अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाच्या नेतृत्वाखालील वाहतूकदार बेमुदत संप पुकारणार आहेत.

मुंबई वाहतूक संघटना आंदोलन
मुंबई वाहतूक संघटना आंदोलन
मुंबई : इ-चलन विरोधात वाहतूक संघटनांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने येत्या ५ मार्च रोजी मुंबई पूर्णत: थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्त्यावर एकही टॅक्सी, कॅब, रिक्षा, खासगी बस धावणार नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या मागण्यांसाठी वाहतूक संघटना अतिशय आक्रमक आहे.
ई-चलन प्रणाली आणि इतर मागण्यांसाठी ५ मार्च २०२६ पासून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अ‍ॅक्शन कमिटी आणि अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाच्या नेतृत्वाखालील वाहतूकदार बेमुदत संप पुकारणार आहेत. ज्यामुळे मुंबईसह राज्यभरात वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतची वाहतूक संघटनांची बैठक सोमवारी निष्फळ ठरली आहे.
advertisement

आंदोलनावर ठाम

मुंबईतील आझाद मैदान येथील 5 तारखेच्या आंदोलनावरती वाहतूक संघटना ठाम आहेत. इ-चलन विरोधात वाहतूक संघटनांचा एल्गार सुरूच राहणार असल्याचे वाहतूक संघटनांनी सांगितले.

नियमात बदल करा

येत्या 5 मार्चला मुंबईत रस्त्यावर एकही टॅक्सी, कॅब, रिक्षा, खासगी बस धावणार नाही, याची आम्ही तयारी करीत आहोत. प्रताप सरनाईक यांनी फक्त सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले, मात्र त्यावर चालणार नाही असा वाहतूक संघटनांनी इशारा दिला. वाहनांवर वारंवार इ चलन मार्फत दंड आकारल्याने अनेकांचा दंडाचा आकडा हा हजारोवर गेला आहे. नियमात बदल करण्याची वाहतूक संघटनांची मागणी आहे.
advertisement

दूध भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होणार?

संपाची हाक प्रत्यक्षात उतरल्यास वाहतूक क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संप ठरू शकतो. संप जर प्रत्यक्षात उतरला तर सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता असून माल वाहतूक बंद राहिल्यास दूध भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

वाहूतक संघटनांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

-चुकीचे दंड आणि पुरावे नसलेले ई-चलान त्वरित बंद करावेत. ई-चलन दंडवसुलीचे साधन बनले असूनत्यातील त्रुटी दूर कराव्यात
advertisement
-नवीन नियमांनुसार ५०% दंड आगाऊ भरल्याशिवाय अपिल करता येत नाहीती तरतूद घटनाबाह्य असल्याने रद्द करावी
-इंधन दरवाढ आणि टोलमुळे व्यवसाय अडचणीत असल्याने प्रवासी व मालवाहतूक वाहनांवरील करात कपात करावी
-नवीन स्वयंचलित चाचणी केंद्रांची (ATS) सुविधा उपलब्ध होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण सुरू ठेवावे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: 5 मार्चला मुंबई थांबणार? टॅक्सी, कॅब, रिक्षा, खासगी बसचा संप? बैठकीतून मोठी अपडेट
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement