advertisement

मित्रांनीच केला अमेरिकेचा घात, 3 विमाने पाडली; इराणला रोखताना F-15 फायटर जेट उडवले, स्वत: दिली कबुली

Last Updated:

F-15E Fighter Jets Shot Down: कुवैतमध्ये सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ‘फ्रेंडली फायर’च्या घटनेत अमेरिकेची तीन McDonnell Douglas F15E Strike Eagle लढाऊ विमाने चुकून पाडली गेल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली.

News18
News18
कुवैत सिटी: अमेरिकन लष्कराने दिलेल्या निवेदनानुसार कुवैतमध्ये सुरू असलेल्या लढाईदरम्यान कुवैती हवाई संरक्षण यंत्रणेकडून चुकून तीन अमेरिकन F-15E स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने पाडली गेली.
निवेदनात म्हटले आहे की, 1 मार्च रोजी रात्री 11:03 वाजता ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला पाठिंबा देत उड्डाण करणारी तीन अमेरिकन F-15E स्ट्राइक ईगल विमाने कुवैतच्या हवाई क्षेत्रात कोसळली. हा प्रकार ‘फ्रेंडली फायर’ म्हणजेच आपल्या मित्र राष्ट्राकडून चुकून झालेल्या गोळीबारामुळे घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट होते.
त्या वेळी सक्रिय लढाई सुरू होती. या कारवाईदरम्यान इराणी लढाऊ विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू होते. अशा परिस्थितीत कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून अमेरिकन वायुसेनेची ही विमाने चुकून लक्ष्य करण्यात आली.
advertisement
या तिन्ही विमानांमधील सर्व सहा वैमानिकांनी वेळेत इजेक्ट करून सुरक्षित बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यांना सुरक्षितरीत्या शोधून काढण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुवैतने या घटनेची कबुली दिली आहे. अमेरिकेने कुवैती संरक्षण दलांच्या तत्परतेबद्दल आणि सुरू असलेल्या कारवाईतील सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी सध्या चौकशी सुरू असून, अधिक माहिती उपलब्ध होताच जाहीर केली जाईल, असे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले आहे.
advertisement
F-15 ईगल इतके खास का?
McDonnell Douglas F-15 Eagle हे जगातील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. 1976 मध्ये सेवेत दाखल झाल्यापासून हवाई युद्धात (Air-to-Air Combat) याचा 104-0 असा विक्रम राहिला आहे. म्हणजेच आजवर कोणत्याही शत्रू विमानाने ते पाडलेले नाही.
हे जेट मॅक 2.5 इतक्या अतिवेगाने उड्डाण करू शकते आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे. सध्याच्या संघर्षात अमेरिका याच जेट्सचा वापर इराणच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी करत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
मित्रांनीच केला अमेरिकेचा घात, 3 विमाने पाडली; इराणला रोखताना F-15 फायटर जेट उडवले, स्वत: दिली कबुली
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement