advertisement

होळीला पांढरे पदार्थ खाणं का टाळावं, काय होतो नेमका परिणाम? आज तुमची 'ही' चूक पडेल महागात

Last Updated:

होळी हा सण रंगांचा, आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आहे. मात्र, आपल्या परंपरेत सणावाराला काय खावे आणि काय टाळावे, याचे काही अलिखित नियम आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा नियम म्हणजे होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाणे टाळावे.

News18
News18
Holi 2026 : होळी हा सण रंगांचा, आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आहे. मात्र, आपल्या परंपरेत सणावाराला काय खावे आणि काय टाळावे, याचे काही अलिखित नियम आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा नियम म्हणजे होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाणे टाळावे. अनेक घरांमध्ये वडीलधारी मंडळी आजही ही परंपरा पाळतात. पण यामागे नेमकी काय कारणे आहेत? जाणून घेऊया.
पांढरे पदार्थ टाळण्यामागची मुख्य कारणे
नकारात्मक शक्तींचा प्रभाव
असे मानले जाते की, होळी आणि विशेषतः होलाष्टकाच्या काळात नकारात्मक ऊर्जा आणि आसुरी शक्तींचा प्रभाव अधिक असतो. पांढरा रंग हा सौम्य आणि शांततेचे प्रतीक असला तरी, तंत्रशास्त्रानुसार नकारात्मक शक्ती पांढऱ्या रंगाकडे लवकर आकर्षित होतात, होळीच्या दिवशी पांढरे पदार्थ जसे की, दूध, दही, तांदूळ, पांढरी मिठाई खाल्ल्याने नजर लागण्याची किंवा बाहेरील बाधा होण्याची शक्यता असते, अशी जुनी समजूत आहे.
advertisement
चंद्र आणि मानसिक स्थिती
पांढरा रंग हा चंद्राशी संबंधित आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. होळी फाल्गुन पौर्णिमाला येते, ज्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वोच्च असतो. ज्योतिषशात्रानुसार, या दिवशी पांढऱ्या रंगाच्या अतिसेवनाने मनाची चंचलता वाढू शकते किंवा भावनिक अस्थिरता येऊ शकते. म्हणूनच संतुलित राहण्यासाठी या दिवशी पांढरे पदार्थ टाळून रंगात मिसळले किंवा इतर रंगाचे पदार्थ खाल्ले जातात.
advertisement
ऋतू बदल आणि आरोग्य
होळी हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा काळ आहे. या काळात शरीरात आजार वाढण्याची शक्यता असते. पांढरे पदार्थ जसे की दही किंवा थंड दूध कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे सर्दी, खोकला किंवा पचनाचे विकार होऊ शकतात. आधुनिक विज्ञानात साखर, मैदा आणि मीठ यांना 'व्हाईट पॉयझन' म्हटले जाते. होळीच्या दिवशी तळलेले आणि गोड पदार्थ जास्त खाल्ले जातात, अशा वेळी अतिरिक्त पांढऱ्या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
होळीला पांढरे पदार्थ खाणं का टाळावं, काय होतो नेमका परिणाम? आज तुमची 'ही' चूक पडेल महागात
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement