Health Tips : हृदयविकार अन् डोळे राहतील चांगले, बदाम दूध पिण्याचे फायदे काय? तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
ड्रायफूड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बदामाचेही आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळत असतात.
advertisement
1/5

आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक जण ड्रायफूड खात असतात. ड्रायफूड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बदामाचेही आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळत असतात. तर तुम्हाला बदामाच्या दुधाचे नेमके कोणते फायदे होतात माहिती आहे का? त्यामधून कोणते घटक आपल्याला शरीराला मिळतात? याविषयीची माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
2/5
जया गावंडे सांगतात की, ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे, अशा लोकांसाठी हे बदामाचे दूध खूप फायदेशीर आहे. विशेष करून बदामाच्या दुधामध्ये कॅलरीज कमी असतात. गाईच्या दुधापेक्षा 70 ते 80% नी या कॅलरीज कमी असतात.
advertisement
3/5
तसेच बदामाच्या दुधामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील कमी असतं. त्यामुळे काही जे ब्रँड असतात ते याला फोर्टीफाईड करतात, ज्यामुळे यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ई, ए ते हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. पण या अलमंड मिल्क मध्ये प्रथिने कमी असतात. त्यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ई आहे आणि ते अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देते.
advertisement
4/5
बदामाचे दूध हृदयविकार आणि शुगरसाठी फायदेशीर असतं. यामध्ये कोलेस्ट्रॉल देखील कमी असते. तसंच यामुळे जे एलडीएल (LDL) असतात ते कमी करून एचडीएल (HDL) वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारायला मदत होते.
advertisement
5/5
अशा प्रकारे बदामाच्या दुधाचे भरपूर प्रमाणात फायदे होतात. जर तुम्हाला घरी हे बदामाचे दूध तयार करायचं असेल तर त्याकरता तुम्ही रात्रभर बदाम भिजत घालायचे आणि सकाळी त्या बदामाचे वरचे कव्हर काढून, त्यामध्ये थोडसं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचे आणि ते गाळल्यानंतर तुमचे फ्रेश असे हे दूध तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हृदयविकार अन् डोळे राहतील चांगले, बदाम दूध पिण्याचे फायदे काय? तज्ज्ञांचा सल्ला